IMPIMP

“राऊतांनी तर मित्राच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं”, आंबेडकरांचा मोठा आरोप

Ambedkar's big accusation was that Raut stabbed his friend in the back

मुंबई : ठाकरे गटाने लोकसभेच्या उमदेवारांची यादी जाहीर केल्यानंतर वंचिने देखील आपले ०७ उमेदवार जाहीर केले. त्यामुळे वंचित आघाडीसोबत येणार अशी शक्यता आता मावळली आहे. त्यावरून संजय राऊतांनी वंचितवर संताप व्यक्त केलाय. अशातच आता ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय राऊत यांनी वंचितच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.

हेही वाचा…“तर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार,” कॉंग्रेसच्या विशाल पाटलांनी दिला इशारा, सांगलीच्या जागेवरून आघाडीत बिघाडी

संजय राऊत तुम्ही तर मित्राच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं आहे. सिल्व्हर ओकवर झालेल्या बैठकीत तुम्ही काय भूमिका घेतली होती ते आम्हाला माहिती आहे. अकोल्यात आमच्याविरोधात उमेदवार उभा करण्याबाबत तुम्ही मुद्दा उपस्थित केला होता हे खरं नाही का? एका बाजूला आघाडी बनवत असल्याचं चित्र निर्माण करताय आणि दुसऱ्या बाजूला आम्हालाच पाडण्याचा कट रचताय, तुम्ही हे कसलं नातं निर्माण करत आहात. तुमचे विचार असे आहेत? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.

हेही वाचा..नाशिकच्या जागेवरून महायुतीत वाजलं, भुजबळांना उमेदवारी दिल्यास मोठ्या बंडाची शक्यता 

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांना आम्ही अकोल्यासह चार जागा देण्यास तयार झालोच होतो. आज जर चर्चा पुढे गेली असती तर सहावी जागाही कदाचित त्यांना दिली असती. हे आम्ही तीन पक्षांनी ठरवले होते. काहीही झाले तरी प्रकाश आंबेडकर यांना बरोबर घेण्याचे आम्ही ठरविले होते. यातच कोणत्याही परिस्थितीत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या भाजपला मदत होणार नाही. अशी काळजी घेण्याचे ठरले होते. आंबेडकर यांनी ९ उमेदवार जाहीर केले असतील तर महाराष्ट्राचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानाचे दुर्दैव आहे. असेही राऊतांनी म्हटले होते.

READ ALSO :

हेही वाचा…निवडणुकीपुर्वीच कॉंग्रेसला मोठा धक्का..! रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द 

हेही वाचा..भारती पवार यांना माहेरमधूनच प्रंचड विरोध ; विजयी होण्याचा मार्ग खडतर 

हेही वाचा…मावळात सुनील शेळकेंनी घेतला युटर्न, श्रीरंग बारणेंचं टेन्शन कमी होण्याची शक्यता 

हेही वाचा…“महायुतीत बंडाची पहिली ठिणगी” शिवतारेंचं बंड थंड, आता बुलढाण्यात शिंदे गटातून बंड ? 

हेही वाचा…“दबंग युवा नेते वाघेरे, बांदल अन् मोरे ‘वंचित’ मधून लढणार?”, लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढती अटळ 

Total
0
Shares
Previous Article
A big blow to Congress even before the election..! Caste validity certificate of Ramtech candidate Rashmi Barve

निवडणुकीपुर्वीच कॉंग्रेसला मोठा धक्का..! रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द

Next Article
Actor Govinda Shinde joined the group; Will Govinda meet the challenge of Amol Kirtika

अभिनेता गोविंदा शिंदे गटात दाखल ; गोविंदाला अमोल किर्तीकरांचं आव्हान पेलणार का ?

Related Posts
Total
0
Share