नागपुर : महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार रश्मी बर्वे यांना निवडणुकीच्या पुर्वीच मोठा धक्का बसला आहे. कॉंग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्या संपुर्ण रामटेक मतदारसंघात जोमाने प्रचार करत असताना दुसरीकडे त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याने कॉंग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काही काळात आता कॉंग्रेस काय भूमिका घेणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा..नाशिकच्या जागेवरून महायुतीत वाजलं, भुजबळांना उमेदवारी दिल्यास मोठ्या बंडाची शक्यता
रामटेक लोकसभा मतदारसंघ हा एससीसाठी राखीव असून रश्मी बर्वे यांनी याच मतदारसंघातून उमेदवारी अर्ज सादर केला. मात्र जात वैधता प्रमाणपत्र मिळवताना कायदेशीर प्रक्रिया पार पडली नसल्याची तक्रार सुनील साळवे यांनी केली आहे. प्राप्त तक्रारीनंतर सामाजिक न्याय विभागाने जात पडताळणी समितीला योग्य ती कारवाई करण्याचा आदेश दिला होता.
सामाजिक न्याय विभागाच्या आदेशानंतर जात पडताळणी समितीने बर्वे यांना नोटीस जारी केली होती. याच नोटिशीला बर्वे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. केवळ राजकीय सुडभावनेतून माझ्यावर अशा प्रकाराचे आरोप करण्यात येत आहेत, असा दावा रश्मी बर्वे यांनी आपल्या याचिकेत केला होता. त्यानंतर आता बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय पडताळणी समितीने दिला आहे.
हेही वाचा…तिकीट कापण्याच्या भीतीने नाराजांची फौजच वर्षावर दाखल, खासदारांची भीती दूर करण्यासाठी मध्यरात्री खलबतं
दरम्यान, कॉंग्रेसच्या रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वे सक्षम उमेदवार मानल्या जात असतानाच जात पडताळणी समितीनं त्यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं आहे. रामटेक एससी राखीव मतदारसंघ आहे. तिकडे २०२१ मध्ये मुंबई हायकोर्टानं ज्यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं. त्या नवनीत राणांनी खासदारकीची संपुर्ण टर्म पुर्ण केली आहे. सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाच्या निकालाला स्थगिती पण दिली होती. आता अंतिम निकाल राखून ठेवला आहे. कोर्टाचा निकाल काय असणार याचा अंदाज भेल सामान्यांना येत नसेल तर भाजपने त्यांना आपल्या पक्षात घेऊन तिकीटीही दिले आहे.
READ ALSO :
हेही वाचा..भारती पवार यांना माहेरमधूनच प्रंचड विरोध ; विजयी होण्याचा मार्ग खडतर
हेही वाचा…मावळात सुनील शेळकेंनी घेतला युटर्न, श्रीरंग बारणेंचं टेन्शन कमी होण्याची शक्यता
हेही वाचा…“महायुतीत बंडाची पहिली ठिणगी” शिवतारेंचं बंड थंड, आता बुलढाण्यात शिंदे गटातून बंड ?
हेही वाचा…“दबंग युवा नेते वाघेरे, बांदल अन् मोरे ‘वंचित’ मधून लढणार?”, लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढती अटळ
हेही वाचा…“तर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार,” कॉंग्रेसच्या विशाल पाटलांनी दिला इशारा, सांगलीच्या जागेवरून आघाडीत बिघाडी