नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करून मोठी आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या बाजूला महायुतीत शिंदे गट, भाजपसह आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही दावा सांगितल्यानंतर मोठा पेच निर्माण झाला आहे. यातच सातारा लोकसभेच्या बदल्यात नाशिकच्या जागेसाठी अजित पवार गट आग्रही असून ती सुटल्याने शिंदे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे. यातच नाशिकच्या जागेसाठी मंत्री छगन भुजबळ स्वत: निवडणूक लढविण्यासाठी आग्रही असल्याने पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण झाला आहे.
हेही वाचा…“महाविकास आघाडीचे भांडण जर मिटत नसेल, तर..”, प्रकाश आंबेडकरांनी दिला मोठा इशारा
महायुतीत छगन भुजबळ यांना नाशिकची जागा सुटल्याची चर्चा सुरू असल्याने शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, खासदार हेमंत गोडसे, आणि सर्व पदाधिकारी दुपारी पुन्हा मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाले. पालकमंत्री दादा भुसे हे देखील थेट मुंबईत सहभागी होणार आहेत. उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेकडे असणारी ही एकमेव जागा आहे. त्यामुळे कुठल्याही स्थितीत ती शिवसेनेला मिळायला हवी, असा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरला जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“आम्ही इथे नरक यातना भोगतोय”, अन् तुम्ही नाटकं..,शिरूरमधून कोल्हेंना पत्र
नाशिक लोकसभा मतदारसंघातून मंत्री छगन भुजबळ यांचं नाव समोर आलं आहे. यातच भुजबळांच्या नावाची चर्चा होत असताना महायुतीत मोठा बंड होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात मराठा समाजाचा प्रचंड रोष आहे. असा अहवाल आज भाजप आणि शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांकडून वरिष्ठ पातळीवर दिला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, मित्र पक्षांनी नाशिक मतदारसंघ खेचून घेण्याच्या तयारीत असताना ठाकरे गटाने बुधवारी शिवसेना ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांचे नाव जाहीर केले. त्यानंतर शालिमार येथील शिवसेना कार्यालयात वाजे यांचा सत्कार करून पदाधिकाऱ्यांनी प्रचाराच्या नियोजनावर चर्चा केली. यातच नाराज झालेल्या विजय करंजकर यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी भेट घडवून समजूत काढली जाईल, असे ठाकरे गटाच्या नेत्यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…तिकीट कापण्याच्या भीतीने नाराजांची फौजच वर्षावर दाखल, खासदारांची भीती दूर करण्यासाठी मध्यरात्री खलबतं
हेही वाचा…भारती पवारांना आपल्याच मतदारसंघात बसणार मोठा फटका ; भाजपसह मित्र पक्षातील नेत्यांची प्रचंड नाराजी
हेही वाचा…महायुतीचा बारामतीचा मार्ग मोकळा ! विजय शिवतारे – अजित पवारांमधील वाद फडणवीसांनी मिटवला…
हेही वाचा…पुण्यात कॉंग्रेसला ठाकरे गटाकडून डच्चू ; लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट धंगेकरांसाठी करणार नाही काम
हेही वाचा..मोठी बातमी..! उद्धव ठाकरेंनी केली १६ शिलेदारांची यादी जाहीर, निवडणूकीत महायुतीला धोबीपछाड देणार