IMPIMP

“आम्ही इथे नरक यातना भोगतोय”, अन् तुम्ही नाटकं..,शिरूरमधून कोल्हेंना पत्र

We are suffering hellish torture here and you are a letter to the foxes from Natak Shirur

पुणे : आज पुन्हा आमचा खासदार म्हणून निवड करण्याचा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिलेला आहे. आपल्याकडून आमच्या भागात फुकट नाटकाचे प्रयोग तसेच वेगवेगळ्या फुकट आरोग्याच्या तपासण्या यासारख्या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. संपुर्ण परिस्थिती पाहता आपल्या वकृत्व शैलीतून आम्हा वाघोली करांना काही फायदा झालेला दिसत नाही. परिणामी येथील लोक नरक यातना भोगत आहेत हेच आपल्याला दिसेल. असे म्हणत वाघोली येथील वाघोलीकरांनी विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी एक पत्र पाठवलं आहे. वाको वेलफेअर असोसिएशन चे अध्यक्ष अनिल कुमार मिश्रा यांनी पत्र पाठवले आहे.

हेही वाचा…आढळराव पाटलांचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश ठरला ; प्रचाराचा नाराळ या दिवशी फोडणार

वाघोली भागात सन २०१९ ते २०२४ या कार्यकाळात केलेल्या कामांचा संपुर्ण तपशील देण्यात यावा, अशी मागणी अमोल कोल्हे यांच्याकडे करण्यात आली आहे. यातच अमोल कोल्हे यांच्यावर संताप व्यक्त करत आपण वेगवेगळ्या रंगमंचावरून तसेच वेग वेगळ्या माध्यमाद्वारे आपल्या अभिनयातून आणि वकृत्व शैलीद्वारे संपुर्ण महाराष्ट्रमध्ये नाव लौकिक मिळवला आहे. आपल्या अभिनयाने तसेच वक्तृत्व कलेतून भारावून गेलेल्या समस्त शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेनी आपल्यावर विश्वास दाखवून निवडून दिल्याचाही उल्लेख पत्रात करण्यात आलाय.

हेही वाचा..नव्या उमेदवारांनी घेतली आघाडी, प्रचारात विद्यमान मात्र सुस्त, भाजपच्या उमेदवारांची वेगळीच दशा

दरम्यान,  वाघोली गावामध्ये पाणी, रस्ते आणि सांडपाणी या सारख्या गंभीर समस्या आहेत. पायाभूत सुविधा मिळत नाही. पोलिस प्रशासन महानगर पालिका प्रशासन, पीएमआरडीए प्रशासन येथे काम करत नाही. शाळेची मुले जीव मुठीत धरून प्रवास करतात. असंख्य लोकांनी आपला येथील रस्त्यावर जीव गमवला आहे. असंख्य लोक गंभीर जखमी झालेले आहे. कित्तेक लोकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. असेही म्हटलं आहे.

READ ALSO :

हेही वाचा…‘पुणे लोकसभेच्या आखाड्यात हजारो मल्ल ठोकणार शड्डू’, पुण्यात 1000 मल्ल मोहोळांचा करणार प्रचार

हेही वाचा…“मला बदनाम करण्याचा प्रयत्न , सगळ्यांची नावे समोर आणणार,” वडेट्टीवारांचा कॉंग्रेसच्याच नेत्यांवर घणाघात

हेही वाचा..एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यात घेरण्याची ठाकरेंची चाल ; श्रीकांत शिंदेंच्या विरोधात केदार दिघे मशाल पेटवणार ? 

हेही वाचा…उत्तर मुंबईतून पियुष गोयल यांच्या विरोधात तेजस्वी घोसाळकर ; ठाकरे दुसरा पत्ता काढण्याच्या तयारीत

हेही वाचा…शिवतारेंनी अजित पवारांना खिंडित गाठलं, शिंदे शिवतारेंवर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत

Total
0
Shares
Previous Article
100 Malla Muralidhar Mohol will campaign for the Pune Lok Sabha Elections

‘पुणे लोकसभेच्या आखाड्यात हजारो मल्ल ठोकणार शड्डू’, पुण्यात 1000 मल्ल मोहोळांचा करणार प्रचार

Next Article
Prakash Ambedkar gave a big warning if the Mahavikas Aghadi's quarrel is not resolved

"महाविकास आघाडीचे भांडण जर मिटत नसेल, तर..", प्रकाश आंबेडकरांनी दिला मोठा इशारा

Related Posts
Total
0
Share