IMPIMP

आढळराव पाटलांचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश ठरला ; प्रचाराचा नाराळ या दिवशी फोडणार

Adharao Patal's party entry into NCP was confirmed; The campaign will burst on this day

मुंबई : गेल्या काही दिवसापासून शिरूर लोकसभा मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी घडतांना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज मुंबई अजित पवार यांच्या बंगल्यावर शिरूर मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, आमदार यांच्यासह शिवाजीराव आढळराव पाटलांसोबत चर्चा पार पडली. यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील येत्या २६ मार्च रोजी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे आता शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे विरूद्ध शिवाजीराव आढळराव पाटील असा सामाना निश्चित झाला आहे.

हेही वाचा..धंगेकरांचा राहुल गांधींवर विश्वास नाही का ? रवींद्र धंगेकरांच्या पोस्टवर गिरीश बापटांचा फोटो

अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी बंगल्यावर शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह मंत्री दिलीप वळसे पाटील, मोहिते पाटील, आमदार चेतन तुपे,अतुल बेनके यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यातच येत्या २६ मार्च रोजी आढळराव पाटलांचा शिरूर लोकसभा मतदारसंघातील एका कार्यक्रमात पक्ष प्रवेश होणार आहे. हा पक्ष प्रवेश अतिशय दिमाखदार असून आम्ही याठिकाणांवरून प्रचाराला सुरूवात करणार अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे.

हेही वाचा..“रक्षा खडसे यांना मोठ्या फरकाने पराभूत करू”, नणंदने भावजयाच्या विरोधात रणशिंग फुंकलं

शिवाजीराव आढळराव पाटलांचा पक्ष प्रवेश सोहळा आम्ही २६ मार्च रोजी करण्याचं ठरवलं आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातून आढळराव पाटलांची उमेदवारी निश्चित झाली आहे का ? यावर बोलतांना तटकरे म्हणाले की, जागावाटपाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. यातच आज देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, बावनकुळे यांच्यासोबत चर्चा झाली. आजच लोकसभेच्या जागावाटपाबाबत शिक्कामोर्तब होईल. त्याच्यामुळेच दिर्घकाळ राजकारणात असलेल्या आढळराव पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश आहे. त्यातून तुम्ही अर्थ काढू शकतात. असे म्हणत तटकरेंनी आढळराव पाटलांच्या उमेदवारीला एकप्रकारे हिरवा झेंडा दाखवला आहे.

दरम्यान, आज अजित पवार यांनी देवगिरी बंगल्यावर शिवाजीराव आढळराव पाटलांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांना बोलावलं आहे. यातच राष्ट्रवादीत प्रवेश करण्याआधी आढळराव आणि अजित पवार एकत्र आल्याचे दिसून आले आहे. आज हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकाला दोघांकडून अभिवादन केले आहे.

READ ALSO :

नव्या उमेदवारांनी घेतली आघाडी, प्रचारात विद्यमान मात्र सुस्त, भाजपच्या उमेदवारांची वेगळीच दशा

हेही वाचा.भारती पवारांना मोठा धक्का बसणार, पक्षातीलच कार्यकर्ते नाराज, विरोधकांना होणार मोठा फायदा

हेही वाचा…“तेच तेच चेहरे किती वेळा देणार”, ? धंगेकरांच्या उमेदवारीनंतर कॉंग्रेसमधील नाराजी उघड 

हेही वाचा…आढळराव पाटील आज हाती घड्याळ बांधणार ; अजित पवारांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष प्रवेश ?

हेही वाचा…विकासकामांच्या जोरावरच निवडणूक लढवणार : मुरलीधर मोहोळ 

Total
0
Shares
Previous Article
New candidates have taken the lead, incumbents are sluggish in campaigning, BJP candidates are i

नव्या उमेदवारांनी घेतली आघाडी, प्रचारात विद्यमान मात्र सुस्त, भाजपच्या उमेदवारांची वेगळीच दशा

Next Article
Shivtare has reached the point of Ajit Pawar Shinde is preparing to take a big action against Shivtare

शिवतारेंनी अजित पवारांना खिंडित गाठलं, शिंदे शिवतारेंवर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत

Related Posts
Total
0
Share