पुणे : महायुतीकडून पुणे लोकसभेसाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर शिक्कामोर्तब केला आहे. तर दुसऱ्या बाजूने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नावाची घोषणा केली आहे. यातच दोन्ही बाजूने आता प्रचाराला सुरूवात केली आहे. यातच रवींद्र धंगेकर यांच्या एका पोस्टरवर माजी खासदार गिरीश बापट यांचा फोटो वापरल्याने एकच चर्चा सुरू झाली आहे. यावर गिरीश बापट यांचे सुपूत्र गौरव बापट यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.
हेही वाचा…“वेळ पडल्यास भाजपच्या कमळावर निवडणुक लढणार, पण पवारांना पाडणारच ” शिवतारे आक्रमक
कॉंग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता प्रचाराला सुरूवात झाली आहे. अनेक नेत्यांच्या आता गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. यातच गिरीश बापट यांचा फोटो असलेला रवींद्र धंगेकर यांचा एक सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत आहे. त्यावर जो आमदार कसब्याचा, तोच खासदार पुण्याचा, मी पुणेकर, मी धंगेकर असं म्हटलंय. त्यावरून आता भाजप आणि कॉंग्रेसमध्ये वाद सुरू झाला आहे.
गौरव बापट म्हणाले की, गिरीश बापटांचा फोटो वापरणं खुपच दुर्दैवी आहे. याचा निषेधच करतो. परंतु ज्यांनी कोणी हा फोटो वापरला आहे. त्यांच्याच कॉंग्रेसच्या नेत्यांवर विश्वास नाही. जे भाजपचे पाच वेळा आमदार होते, दोन वेळा खासदार होते, कॅबिनेट मंत्री होते. त्यांचा फोटो आपल्या प्रचारासाठी वापरणं हे कुठेतरी कॉंग्रेच्याच नेत्यांवर विश्वास नसल्याचे दिसून येतंय.
हेही वाचा…उमेदवारीसाठी उदयनराजे दिल्लीत तळ ठोकून, दिल्लीतील मुक्काम आणखी वाढला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामावर त्यांचा विश्वास बसला आहे. यातून कॉंग्रेसच्या पराभूत मानसिकता लक्षात येतं. विरोधकांना विरोध म्हणून करावं लागतंय. त्यामुळे आम्ही हे हास्यास्पद म्हणून सोडून देतोय. असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, आपल्यावर विश्वास असता तर अशा गोष्टी त्यांना करण्याची कोणतीही गरज नाही. एखाद्या निवडणुकीत जय पराजय होत असतो. परंतु आज ना उद्या पुण्यात भाजपचा विजय हा निश्चित आहे. मला नाही वाटत की पुण्याची निवडणुक इतकी टप होईल. चांगल्या पद्धतीने पुण्याची निवडणुक होईल आणि आमचा उमेदवार बहुमताने विजय होईल असेही त्यांनी सांगितले आहे.
READ ALSO :
हेही वाचा..“रक्षा खडसे यांना मोठ्या फरकाने पराभूत करू”, नणंदने भावजयाच्या विरोधात रणशिंग फुंकलं
हेही वाचा…“मला लोकसभा निवडणुक लढवायचीच नव्हती, पण…”, बीडमध्ये पंकजा मुंडेंचं मोठं विधान
हेही वाचा…ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदार शिंदे गटात दाखल
हेही वाचा…स्वरा भास्कर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात ; कॉंग्रेस ‘या’ मतदारसंघातून उमेदवारी देणार ?
हेही वाचा.‘पुण्याच्या सेवेसाठी मोहोळ हक्काचे खासदार असतील’, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा विश्वास