नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने काही दिवसांपुर्वीच महाराष्ट्रातील २० उमेदवारांची यादी जाहीर केलीय. मात्र यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघातील उदयनराजे भोसले यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाहीय. त्यामुळे उदयनराजे भोसले यांचे कार्यकर्ते नाराज असल्याचे दिसून येत आहे. यातच लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे दिल्लीत तळ ठोकून राहिले आहेत.
हेही वाचा…ऐन निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसच्या उमेदवाराला घेरलं ; रश्मी बर्वे म्हणाल्या, “‘माझ्या विरोधात षडयंत्र”
सातारा लोकसभा मतदारसंघातून अद्यापही उमेदवारी जाहीर न झाल्याने उदयनराजे नाराज असल्याचे दिसून येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बोलून त्यांनी आपली नाराजीही बोलून दाखवली होती. मात्र तिथेही समाधआन न झाल्याने त्यांनी आता दिल्ली गाठली आहे.
हेही वाचा…“तोपर्यंत पुण्याची निवडणुक एकतर्फी होऊ देणार नाही”, वसंत मोरेंनी घेतला मोठा निर्णय
उदयनराजे भोसले यांना दिल्लीत अमित शाह यांची भेट घ्यायची होती. आज उद्या अमित शाहांची भेट मिळेल असे उदयनराजे यांना सांगणअयात आले होते. त्यामुळे उदयन राजे भोसले दिल्लीत थांबून आहेत. शुक्रवारी उदयनराजे भोसले यांना अमित शाह यांची भेट मिळेल असे सांगितले जात होते. परंतु ही भेटदेखील लांबणीवर पडली आहे. त्यामुळे उदयनराजे भोसले यांचा दिल्लीतील मुक्काम आणखी वाढला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“महाराजांना राजकारणात लक्ष घालण्याची आता हीच वेळ ;” शाहू महाराजांनी स्पष्ट केली भूमिका
हेही वाचा…पुण्यात धंगेकर विरूध्द मोहोळ सामाना , लोकसभेसाठी कॉंग्रेसच्या सात उमेदवारांची घोषणा
हेही वाचा..सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरे बारामतीत ; थोपटे परिवाराची मनधरणी करण्याचे प्रयत्न
महाराष्ट्रात तिसरी आघाडी निवडणुकीच्या रिंगणात ; 48 जागा लढविणार, ३२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
हेही वाचा…“राज ठाकरेंचा पक्ष संपवण्याचा अदृश्य शक्तीचा प्रयत्न”, सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्लाबोल