नागपुर : रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या कॉंग्रेसच्या रश्मी बर्वे अडचणीच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर रश्मी बर्वे यांच्याकडे अवैध जातप्रमाणपत्र असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे निवडणुक तोंडावर आली असता बर्वे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यावर आता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…रामटेक अन् नागपुरमध्ये पहिल्याच दिवशी ११३ अर्जांची विक्री, ४०० पेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
रश्मी बर्वे म्हणाल्या की, माझ्या विरोधात षडयंत्र रचलं जात आहे. मी मागासवर्गीय चांभार समाजाची आहे. माझं जात प्रमाणपत्र अवैध आहे तर मग मी एवढे दिवस जिल्हा परिषद सदस्य म्हणून कसे काम करत आहे ? मला नोटीस मिळाली नाही. ऐन निवडणुकीच्या आधी माझं नाव उमेदवारीसाठी घेतलं जातं असताना हा सगळा प्रकार का होत आहे ? असा सवाल करत हे षडयंत्र आहे. कारण माझं नाव सध्या उमेदवारीसाठी आघाडीवर असल्याचे रश्मी बर्वे यांनी म्हटलयं.
हेही वाचा…अजित पवार गटातील ‘विलास लांडे’ अपक्ष लढणार, शिरूरमध्ये तिरंगी लढत अटळ ? राजकीय वर्तुळात एकच चर्चा
दरम्यान, रामटेक लोकसभा मतदारसंघावरून भाजप आणि शिंदे गटात चांगलीच रस्सीखेच सुरू असतांना दिसत आहे. शिंदे गटाचे विद्यमान खासदार कृपाल तुमाणे यांनी पुन्हा उमेदवारीवर दावा सांगितला आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपचे अनेक नेते लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“तोपर्यंत पुण्याची निवडणुक एकतर्फी होऊ देणार नाही”, वसंत मोरेंनी घेतला मोठा निर्णय
हेही वाचा..पंकजा मुंडेंना धनंजय मुंडेंची ताकद मिळणार ; बीडचं मैदान महायुतीच मारणार ?
हेही वाचा…“पैलवान कधीच म्हातारा होत नसतो”, शरद पवारांचा उल्लेख करत ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा…रणजित सिंह निंबाळकरांच्या उमेदवारीवर भाजप ठाम ; नाराजींची नाराजी भाजप दुर कशी करणार ?
हेही वाचा…मनसेच्या महायुतीतील सहभागाची आजच घोषणा ; राज ठाकरेंना किती जागा? हालचालींना वेग