मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत मनसे सामील होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज ठाकरे यांच्यासोबत बैठक पार पडली. मिळालेल्या माहितीनुसार मनसे महायुतीच सामील होण्याची घोषणा आजच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ट्रिपल इंजीनला मनसेचा डब्बा जोडला जाणार ? अशी चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा…‘त्या’ ७ जागांवर कॉंग्रेसला मदत करायला तयार ; प्रकाश आंबेडकरांचं कॉंग्रेसला पत्र
मागील काही दिवसापासून महायुतीसोबत मनसेची युतीची चर्चा सुरू झाली आहे. यातच आगामी लोकसभा निवडणुकीत दोन जागा मिळाव्यात अशी मनसेची आग्रही भूमिका राहिली आहे. मनसेला मुंबईतील दक्षिण मुंबई आणि नाशिक किंवा शिर्डी ही जागा हवी आहे. मात्र भाजप दोन्ही जागा देण्यास तयार नाही. मात्र मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याची माहिती समोर आलीय.
हेही वाचा…मनसेला महायुतीत किती जागा ? अमित ठाकरे लोकसभा लढवणार का ? भाजपला मनसेचा फायदा कुठे ?
आज राज ठाकरे यांनी एकत्रित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चा केलीय. आज हॉटेल ताज लॅंडसमध्ये लोकसभा जागावाटपाबाबत चर्चा झाली. या चर्चेत आता राज ठाकरे यांना किती जागा मिळणार ? तसेच महायुतीत सामील होणार का ? याबाबत आजच घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्राचं लक्ष आता याकडे लागून राहिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…रामटेक अन् नागपुरमध्ये पहिल्याच दिवशी ११३ अर्जांची विक्री, ४०० पेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
हेही वाचाअजित पवार गटातील ‘विलास लांडे’ अपक्ष लढणार, शिरूरमध्ये तिरंगी लढत अटळ ? राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचा…कसब्याची जादू पुण्यातही दिसणार ; पुण्यातून कॉंग्रेसचे धंगेकर लोकसभेसाठी निश्चित
हेही वाचा…कॉंग्रेस लोकसभेच्या १८ जागा लढविणार ; महायुतीसमोर तगडे आव्हान, उमेदवारांची यादी जाहीर ?
हेही वाचा…अखेर माढा लोकसभा मतदासंघाचा तिढा सुटला ; रामराजे नाईक निंबाळकर यांचं एक पाऊल मागे