नागपुर : लोकसभा निवडणुकीच्या १९ एप्रिलला होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणुक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पाच मतदारसंघ समाविष्ट असून नागपुर, आणि रामटेकमध्येही अर्जांची विक्री सुरू झाली आहे. इंडिया अगॅस्ट ईव्हीएम संघटनेने नागपुर व रामटेक या दोन्ही मतदारसंघात ४०० च्या वर उमेदवार उभे करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार पहिल्याच दिवशी नागपुर व रामटेक या दोन मतदारसंघात ११३ अर्जांची विक्री झालीय.
हेही वाचा…मनसेला महायुतीत किती जागा ? अमित ठाकरे लोकसभा लढवणार का ? भाजपला मनसेचा फायदा कुठे ?
नागुपर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर कॉंग्रेसकडून विकास ठाकरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तर अनुसुचित जातीकरीता राखीव असलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसकडून रश्मी बर्वे यांच्या नावाची चर्चा आहे. तर विद्यमान खासदार कृपाल तुमने यांचा पत्ता कट केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…“प्रणिती शिंदेंना फोडण्याचा भाजपचा शेवटपर्यंत प्रयत्न, पण…,” सुशील कुमार शिंदेंचा मोठा दावा
महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात चंद्रपुर, नागुपर, रामटेक, गडचिरोली-चिमूर, भंडारा-गोंदिया या मतदारसंघात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता उमेदवारी अर्जांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू झालीय. इंडिया अगेस्ट ईव्हीएम संघटनेने नागपुर, रामटेक या मतदारसंघात ४०० च्या वर उमेदवार उभे करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अर्जांची विक्री पाहता तो खरा ठरतो का ? अशी शंका व्यक्त केली जात आहे. एका मतदारसंघात ३८४ पेक्षा जास्त उमेदवार उभेराहल्यास बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या लागतील.
READ ALSO :
हेही वाचाअजित पवार गटातील ‘विलास लांडे’ अपक्ष लढणार, शिरूरमध्ये तिरंगी लढत अटळ ? राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचा…कसब्याची जादू पुण्यातही दिसणार ; पुण्यातून कॉंग्रेसचे धंगेकर लोकसभेसाठी निश्चित
हेही वाचा…कॉंग्रेस लोकसभेच्या १८ जागा लढविणार ; महायुतीसमोर तगडे आव्हान, उमेदवारांची यादी जाहीर ?
हेही वाचा…अखेर माढा लोकसभा मतदासंघाचा तिढा सुटला ; रामराजे नाईक निंबाळकर यांचं एक पाऊल मागे
हेही वाचा…‘त्या’ ७ जागांवर कॉंग्रेसला मदत करायला तयार ; प्रकाश आंबेडकरांचं कॉंग्रेसला पत्र