मुंबई : मागील काही दिवसांपासून चर्चेत आलेल्या माढा लोकसभेबाबत आता महायुतीला मोठा दिलासा मिळाला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेले रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासमोर महायुतीचं काम करण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे महायुतीचे तसेच भाजपचे उमेदवार रणजित नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला रामराजे नाईक निंबाळकर यांना पाठिंबा दिल्याचे संकेत मिळाले आहे.
हेही वाचा…मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार? ‘या’ माजी खासदार हाती भगवा घेणार ?
भाजपने रणजित सिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर रामराजे निंबाळकर नाराज असल्याची चर्चा सुरू होती. यानंतर रामराजे निंबाळकर यांनी मोहिते पाटील यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान महायुतीतील अनेक नेते एकाच ठिकाणी आले होते. त्यामुळे महायुतीत बंड पुकारला जाणार का अशी चर्चा होती. मात्र रामराजे निंबाळकर यांनी फडणवीसांसह अजित पवारांची बैठक झाली. या बैठकीत रामराजे यांची नाराजी दूर करण्यात आल्याची माहिती समोर आलीय.
हेही वाचा…“चंद्रपूरमधून काँग्रेसच्या उमेदवार धानोरकर की वडेट्टीवार ; राजकीय वर्तुळात चर्चा”
आज सकाळी रामराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, रणजीत निंबाळकर आणि श्रीकांत भारतीय यांच्यासह फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत एकत्रित बैठक पार पडली. या बैठकीतनंतर सगळं काही ठिका आहे अशा पद्धतीने श्रीकांत भारतीय यांनी प्रतिक्रिया देत माढा लोकसभा मतदासंघातील जिल्हातील तिढा सुटला असल्याची भावना दिसून आली.
READ ALSO :
हेही वाचा…‘त्या’ ७ जागांवर कॉंग्रेसला मदत करायला तयार ; प्रकाश आंबेडकरांचं कॉंग्रेसला पत्र
हेही वाचा…मनसेला महायुतीत किती जागा ? अमित ठाकरे लोकसभा लढवणार का ? भाजपला मनसेचा फायदा कुठे ?
हेही वाचा…“प्रणिती शिंदेंना फोडण्याचा भाजपचा शेवटपर्यंत प्रयत्न, पण…,” सुशील कुमार शिंदेंचा मोठा दावा
हेही वाचा…“तर मला पहिल्या क्रमांकाची मतं मिळणार”, पुणे लोकसभेबाबत वसंत मोरे यांचा मोठा दावा
हेही वाचा…“भाजपची बंदुक अजितदादांच्या खांद्यावरून..,” रोहित पवारांकडून चंद्रकांत पाटलांचा समाचार