सोलापुर : गेल्या काही दिवसांपासून सोलापुर लोकसभेबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू झाली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत सोलापुर मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र याठिकाणी भाजपकडून विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांचं तिकीट कापून आमदार राम सातपुते यांच्या नावाची चर्चा आहे. तर दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. अशातच आता माजी मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी मोठं विधान केलंय.
हेही वाचा…‘शिर्डी आठवलेंना सोडा, अन्यथा, मावळ अन् शिरूरमध्ये…’ आरपीआयने दिला महायुतीला कडक इशारा
भाजपचा शेवटपर्यंत प्रणिती शिंदे यांना फोडण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रणिती तिच्या विचारांशी, कॉंग्रेसच्या विचारांशी प्रामाणिक असल्याने तिने भाजपचात जाण्याचा निर्णय घेतला नाही. सोलापुरच्या जागेसाठी ते प्रयत्न करत आहेत. प्रणितीला आपल्या पक्षात घेण्यासाठी त्यांनी आतापर्यंत खुप प्रयत्न केल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा…महायुतीत सामील झाल्यास मनसेला मिळणार दक्षिण मुंबई, तर महायुतीला ‘या’ ठिकाणी होणार मनसेचा फायदा
प्रणिती गांधी आणि नेहरूंचे विचार जिथे आहेत, ती तिथेच राहील. गांधी-नेहरूंच्या विचारांशी प्रामाणिक असलेल्या कार्यकर्त्यांची संख्या खूप आहे. प्रणितीसुद्धा त्यांच्या पैकीच एक आहे. ती विचारांनी कणखर आहे. पक्ष सोडून जाणं तिला पटत नाही. आतापर्यंत ज्या जनतेनेने आपल्याला तीन वेळा निवडून दिलं आहे. त्या जनतेला आणि पक्षाला ती सोडून जाऊ इच्छीत नाही. असेही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“तर मला पहिल्या क्रमांकाची मतं मिळणार”, पुणे लोकसभेबाबत वसंत मोरे यांचा मोठा दावा
हेही वाचा…“भाजपची बंदुक अजितदादांच्या खांद्यावरून..,” रोहित पवारांकडून चंद्रकांत पाटलांचा समाचार
हेही वाचा…मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार? ‘या’ माजी खासदार हाती भगवा घेणार ?
हेही वाचा…“चंद्रपूरमधून काँग्रेसच्या उमेदवार धानोरकर की वडेट्टीवार ; राजकीय वर्तुळात चर्चा”
हेही वाचा…पहिल्या टप्प्यातल्या मतदारसंघात कॉंग्रेस अन् भाजपमध्ये होणार कडवी टक्कर ; राजकीय गणितं काय ?