पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजयला सुरूवात झाली आहे. राज्यात पक्ष फुटीनंतर लोकसभा निवडणुक खुपच अटीतटीची झाली आहे. यामध्ये संपुर्ण देशाचं आता बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष लागून राहिलं आहे. यातच महायुतीची बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आम्हाला फक्त शरद पवारांचा पराभव करायचा आहे. असे विधान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय. त्यावरून आता शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी त्यावर प्रत्युत्तर दिलंय.
हेही वाचा…रक्षा खडसेंच्या उमेदवारीवरून भाजपात बंड, असंख्य कार्यकर्ते अन् पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
सहा दशकं महाराष्ट्राची व देशाची सेवा करणाऱ्या आदरणीय पवार साहेबांचा पराभव करणं हे कपटी भाजपचं लक्ष्य असल्याचं चंद्रकांत दादांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट झालं, पण त्यासाठी बंदूक मात्र अजितदादांच्या खांद्यावरून चालवायचीय. ‘वापरा आणि फेकून द्या’ ही भाजपची निती जगजाहीर आहे. असल्याचे रोहित पवारांनी म्हटलंय.
हेही वाचा…“सख्खा भावाने अजित दादांना खडसावलं ; अजित पवार गटाकडून दिलं जोरदार प्रत्युत्तर”
दरम्यान, पुढे बोलतांना ते म्हणाले की, ज्यांनी आपल्याला या स्थानापर्यंत पोचवलं त्या आदरणीय पवार साहेबांच्या पराभवासाठी आपला वापर करुन द्यायचा की नाही, हे आता अजितदादांनीच ठरवायचंय आणि त्यांना ठरवता येत नसेल तर त्यांच्यासोबत असलेल्या पण आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी ते ठरवावं! शिवाय पवार साहेब ही व्यक्ती नाही तर विचार आहे, तो संपवणं भाजपला कदापि शक्य नाही, हेही भाजपाने लक्षात ठेवावं! असा इशाराही त्यांनी दिलाय.
READ ALSO :
हेही वाचा…मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार? ‘या’ माजी खासदार हाती भगवा घेणार ?
हेही वाचा…“चंद्रपूरमधून काँग्रेसच्या उमेदवार धानोरकर की वडेट्टीवार ; राजकीय वर्तुळात चर्चा”
हेही वाचा…पहिल्या टप्प्यातल्या मतदारसंघात कॉंग्रेस अन् भाजपमध्ये होणार कडवी टक्कर ; राजकीय गणितं काय ?
हेही वाचा…‘शिर्डी आठवलेंना सोडा, अन्यथा, मावळ अन् शिरूरमध्ये…’ आरपीआयने दिला महायुतीला कडक इशारा
हेही वाचा…महायुतीत सामील झाल्यास मनसेला मिळणार दक्षिण मुंबई, तर महायुतीला ‘या’ ठिकाणी होणार मनसेचा फायदा