पुणे : राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली. त्यानंतर पवार कुटुंबात मोठी फुट पडली. मात्र विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवारांनी उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू केल्याने आता पवार घराण्यातून अजित पवारांवर जोरदार टिका करण्यास सुरूवात झाली आहे. यातच अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पाटील यांनी अजित पवारांवर जोरदार टिका केली आहे. यावेळी श्रीनिवास पाटील यांनी अजित पवारांचा नालायक माणूस असा उल्लेख करण्यात आला. यातच आता अजित पवार गटाकडून त्याला प्रत्युत्तर देण्यात आलंय.
हेही वाचा…कोल्हापुरची जागा शाहू महाराजांसाठी तर सांगलीतून चंद्रहार पाटील, मविआचं जागावाटपाचं ठरलं
स्वतःच्या सख्या भावाला विरोधात उभे करण्याचा हा कुटील डाव आहे. बारमतीकरांमध्ये द्विधा मनस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. बारमतीकर हुशार आहेत. कोणी त्यांना खंबीरपणे साथ दिली हे बारामतीकर जाणून आहेत, त्यामुळे या छोटेखानी सभेचा काहीच परिणाम होणार नाही अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी मांडली. काल गाव सभामध्ये श्रीनिवास पवार यांनी अजितदादांवर केलेल्या टीकेवर मिटकरी यांनी माध्यमांशी संवाद साधला.
भावनिक वातारण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. अजितदादांचा परिवार हा सबंध बारामतीकर आहे. आज श्रीनिवास पवार बोलत आहेत ते यापूर्वी काही का बोलले नाही असा सवाल उपस्थित करत भावनिक वातावरणाचा कोणताही परिणाम होणार नाही असे सांगत सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी रक्ताचे पाणी करू व त्यांना निवडून आणू असा विश्वास अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला.
हेही वाचा…शिरूर लोकसभाबाबत महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटेना, आढळरावांची मुख्यमंत्र्यांकडून चर्चेवर बोळवण
दरम्यान, अजिदादांच्या विरोधात कसा काय आलो याचं आश्चर्य वाटलं असेल. दादांच्या चांगल्या आणि वाईट काळात मी त्यांच्यासोबत होतो. त्यांनी जे निर्णय घेतले त्याला मी साथ दिली. भाऊ म्हणून त्यांनी सांगितलं तिथे उडी मारली. कधी काही विचारलं नाही, पण आमची जेव्हा चर्चा जाली तेव्हा माझं म्हणणं होतं की आमदारकी तु आहेत तर खासदारकी साहेबांकडे दिली पाहिजे. कारण साहेबांचे आमच्यावर उपकार आहेत. साहेबांचं वय आत ८३ झाल्यामुळे या वयात त्यांना सोडणे मला पटले नाही. वयस्कर झालेल्या माणसाची आपण किमंत करत नाही हा विचारच मला वेदना देऊन गेला. कारण पुढची १० वर्षे दुसऱ्या व्यक्तीकडून लाभ मिळणार आहे. याच्यासारखा नालायक माणूस नाही असे म्हणत श्रीनिवास पाटील यांनी अजित पवारांना चांगलचं सुनावलं.
READ ALSO :
हेही वाचा…सांगलीच्या जागेवरून ठाकरे अन् कॉंग्रेसमध्ये मोठी लढाई ; महाविकास आघाडीचे नेते आमनेसामने
हेही वाचा…जागा वाटपात ठाकरे मोठा भाऊ, २२-१६-१० लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला
हेही वाचा…माढ्यात महायुतीचे नेते आपल्याच उमेदवाराचा गेम करणार, बंडखोरी टाळण्यासाठी भाजपकडून महाजनाला पाचरण
हेही वाचा…“याच्यासारखा नालायक माणूस नाही”, सख्या भावाने अजित पवारांना खडसावलं
लोकसभेसाठी शरद पवारांचे ‘१०’ शिलेदार ठरले ; भाजपसह अजित पवारांनाही देणार मोठी टक्कर