सोलापुर : महाविकास आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये ठाकरे गटाला सर्वाधिक २२ जागा त्याच्या खालोखाल कॉंग्रेसला १६ तर शरद पवार गटाला १० जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र यातील काही जागांवर अजूनही महाविकास आघाडीत एकमत न झाल्याचं दिसून येत आहे. यातच सांगलीच्या जागेवरून आता कॉंग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात रस्सीखेच सुरू असल्याचं दिसून येत आहे.
हेही वाचा…शिरूर लोकसभाबाबत महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटेना, आढळरावांची मुख्यमंत्र्यांकडून चर्चेवर बोळवण
कोल्हापुरची जागा ही शाहू महाराज यांना सोडण्यात आली असून ती जागा कॉंग्रेसला सोडण्यात आली आहे. त्याच्या बदल्यात सांगली ही ठाकरे गटाला सोडण्यात आल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिलीय. मात्र त्यावर कॉंग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी हस्तक्षेप नोंदवला आहे. महाविकास आघाडीची भूमिका संजय राऊतांनी व्यक्तिगत मांडू नये, सांगलीची जागा कॉंग्रेस सोडणार नाही. असे विश्वजीत कदम यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“श्रीरंग बारणेंच्या विरोधात भाजप बंडाच्या पावित्र्यात..”, मावळात महायुतीत मिठाचा खडा ?
पुढे बोलतांना कदम म्हणाले की, सांगली जिल्हा हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यासाठी ठाकरेंनी हट्ट करू नये. सांगलीत आज ६०० गावे आहेत. शिवसेनेच्या नेतृत्वानं सांगावे, यातील १० टक्के ग्रामपंचायती तरी त्यांच्याकडे आहेत का ? कुठल्याही परिस्थितीत आम्ही सांगली मतदारसंघ सोडणार नाही. टोकाची भूमिका घ्यायला लागली तरी घेऊन परंतु ही जागा कॉंग्रेसकडे राहिली पाहिजे हे आमचे ठाम मत असल्याचेही विश्वजीत कदम यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कोल्हापुर लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसकडून शाहू महाराज निवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर सांगली लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांनी निवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त केलीय. चंद्रहार पाटलांनी अलिकडेच ठाकरे गटात प्रवेश केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…जागा वाटपात ठाकरे मोठा भाऊ, २२-१६-१० लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला
हेही वाचा…माढ्यात महायुतीचे नेते आपल्याच उमेदवाराचा गेम करणार, बंडखोरी टाळण्यासाठी भाजपकडून महाजनाला पाचरण
हेही वाचा…“याच्यासारखा नालायक माणूस नाही”, सख्या भावाने अजित पवारांना खडसावलं
लोकसभेसाठी शरद पवारांचे ‘१०’ शिलेदार ठरले ; भाजपसह अजित पवारांनाही देणार मोठी टक्कर
हेही वाचा…कोल्हापुरची जागा शाहू महाराजांसाठी तर सांगलीतून चंद्रहार पाटील, मविआचं जागावाटपाचं ठरलं