पुणे : राष्ट्रवादी पक्षात फुट पडल्यानंतर अनेक ज्येष्ठ नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडली. मात्र आता शरद पवारांनी नव्या उमेदवारांना लोकसभेच्या निवडणुकीत उतरवण्याची रणनिती आखली आहे. महाविकास आघाडीकडून राज्याच्या ४८ लोकसभा मतदारसंघापैकी शरद पवार गटाला दहा जागा मिळणार आहे. या दहा जागांसाठी आता शरद पवारांनी तयारी सुरू केली आहे. यातच आता लोकसभेसाठी शरद पवारांच्या दहा उमेदवारांची संभाव्य यादी समोर आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून सध्या माजी. जे.ड.पी सदस्य भास्कर भागरे यांचं नाव चर्चेत आलं आहे. निफाड येथील झालेल्या शेतकरी मेळाव्यात भागरे यांनी निवडणुक लढवण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला माजी आमदार आणि कम्युनिष्ठ पार्टीचे नेते जे.पी. गावित यांनी देखील या जागेवर दावा सांगितला आहे. मात्र ही जागा शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“मोदींची गॅरंटी संविधानाला धोका, निवडणुकीपुर्वीच कॉंग्रेसचा भाजपवर हल्लाबोल
विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांची बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यांनी आपल्या प्रचाराला सुरूवातही केली आहे. तर शिरूर लोकसभेतून पुन्हा एकदा अमोल कोल्हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यातच शरद पवार गटाच्या ताफ्यात असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी मिळणार आहे.
माढ्यात महायुतीकडून भाजपचे विद्यमान खासदार रणजित सिंह निंबाळकर पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज असलेल्या धैर्यशील मोहित पाटील यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर सध्या अजित पवार गटात असलेले आमदार निलेश लंके यांना दक्षिण नगरमधून खासदार सुजय विखे पाटलांच्या विरोधात उतरविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
हेही वाचा…संपुर्ण देशात आचारसंहिता लागू ; निवडणुकीच्या काळात काय करावे , काय करू नये ? वाचा
यातच अगदी कमी कालावधीत सोशल मीडियावर चर्चेत आलेले नितेश कराळे मास्तर सध्या वर्ध्यातून संभाव्य उमेदवार असतील असेही बोललं जात आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातून बाळ्यामामा म्हात्रे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. तर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याविरोधात बीड लोकसभेतून ज्योती मेटे किंवा बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या नावाची चाचपणी शरद पवार गटाकडून केली जात आहे.
तर रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे याठिकाणी सुरूवातीला आमदार एकनाथ खडसे यांची कन्या आणि प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र खडसे यांनी लोकसभा निवडणुक न लढण्याचे ठरवल्याने याठिकाणी आता संतोष चौधरी यांचं नाव आघाडीवर आलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…कोल्हापुरची जागा शाहू महाराजांसाठी तर सांगलीतून चंद्रहार पाटील, मविआचं जागावाटपाचं ठरलं
हेही वाचा…शिरूर लोकसभाबाबत महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटेना, आढळरावांची मुख्यमंत्र्यांकडून चर्चेवर बोळवण
हेही वाचा…“श्रीरंग बारणेंच्या विरोधात भाजप बंडाच्या पावित्र्यात..”, मावळात महायुतीत मिठाचा खडा ?
हेही वाचा…“आजोबाला अर्धांगवायू, वय वर्षे ६२, पेशाने रिक्षाचालक, येणार तर मोदीच “, भाजप नेत्याचा अनुभव
“तिकीट कापलं, तरीही पक्षावर निष्ठा कायम, मुळीकांची मोहोळांनी घेतली गळाभेट”