पुणे : लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजला असला तरी राज्यात महायुतीत जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. यातच मावळ लोकसभा मतदारसंघात तर महायुतीत हा पेच आणखी वाढतच चालला आहे. विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी आपली उमेदवारी आधीच जाहीर केली आहे. मात्र श्रीरंग बारणे यांना आता महायुतीतीच अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके यांनी विरोध केला आहे. असे असतानाच भाजपच्या बाळा भेगडे यांनी तर थेट बारणेंच्या प्रचारात न उतरण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मावळात बारणेंच्या विरोधात भाजप बंडाच्या भूमिकेत दिसून आल्याचे चित्र सध्या निर्माण झालं आहे.
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीची घोषणा, महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ? वाचा सविस्तर
श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके यांनी कडाडून विरोध केलाय. तर सर्वात जास्त ताकद असलेल्या भाजपला ही जागा मिळावी अशी भूमिका बाळा भेगडे यांनी घेतली आहे. यातच मावळ भाजप कोअर कमिटीने दोन वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मात्र त्याला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी आक्रमक भूमिका घेतली आहे. याचसंदर्भात बाळा भेगडे यांच्या निवासस्थानी भाजपच्या कार्यकर्त्यांची तातडीची बैठक पार पडली.
हेही वाचा…“निवडणुकीच्या दरम्यान पैसे वाटप सुरू असल्यास १०० मिनिटात आम्ही पोहचणार”, निवडणुक आयुक्तांनी दिला कडक इशारा
या बैठकीत जर महायुतीकडून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली तर प्रचारात न उतरण्याचा निर्णय कार्यकर्त्यांकडून घेण्यात आला आहे. या बैठकीतील भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठा प्रतिसाद दिला. तर यावेळी बाळा भेगडे यांच्यावर काही कार्यकर्त्यांकडून स्तृतीसुमने देखील उधळली गेली. तसेच निवडणुक आल्यावर खासदार बारणेंना फक्त भाजपची आठवण येते, असे म्हणत यावेळी संतापही व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून ठाकरे गटात असलेले संजोग वाघेरे यांना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मावळात झालेल्या कार्यक्रमात थेट ठाकरेंनी वाघेरे यांची उमेदवारीही जाहीर करून टाकली आहे. महायुतीतच असाच वाद सुरू राहिला तर याचा फायदा वाघेरे यांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता महायुतीत ही जागा नेमकी कुणाला जाणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आजोबाला अर्धांगवायू, वय वर्षे ६२, पेशाने रिक्षाचालक, येणार तर मोदीच “, भाजप नेत्याचा अनुभव
“तिकीट कापलं, तरीही पक्षावर निष्ठा कायम, मुळीकांची मोहोळांनी घेतली गळाभेट”
हेही वाचा…“मोदींची गॅरंटी संविधानाला धोका, निवडणुकीपुर्वीच कॉंग्रेसचा भाजपवर हल्लाबोल
हेही वाचा..संपुर्ण देशात आचारसंहिता लागू ; निवडणुकीच्या काळात काय करावे , काय करू नये ? वाचा
हेही वाचा…लोकसभा निवडणुकांची घोषणा, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की..,