पुणे : पुणे लोकसभेसाठी भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांच्यात चांगलीच स्पर्धा सुरू होती. दोन्हीही नेत्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी पुण्यात धार्मिक कार्यक्रमांवर भर दिला होता. मात्र अखेर भाजपने मुरलीधर मोहोळ यांच्यावर विश्वास दाखवत पुणे लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. मात्र यानंतरही जगदीश मुळीक नाराज नसल्याचे दिसून आले. यातच आज मुरलीधर मोहोळ यांनी जगदीश मुळीक यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
हेही वाचा…लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजला ; एकूण सात टप्प्यात मतदान होणार , महाराष्ट्रात कधी ? आयोगाची मोठी घोषणा
पुणे लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी आपला प्रचार करण्यास सुरूवात केला आहे. यातच आता पुण्यातील महत्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी मोहोळ यांच्याकडून सुरू झाल्या आहेत. अशातच आज त्यांनी जगदीश मुळीक यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी मुळीक कुटुंबांनी औक्षण आणि पुष्पगुच्छ देऊन मोहोळ यांचं स्वागत केलं. यातच लोकसभा निवडणुकीसह विविध विषयांवर चर्चा केल्याची प्रतिक्रिया त्यानंतर मोहोळ यांनी दिली.
हेही वाचा…बीडमध्ये शरद पवार धक्कातंत्राचा वापर करणार ; तगडा चेहरा निवडणुकीच्या रिंगणात
दरम्यान, पुणे लोकसभेसाठी तिकीट कापल्यानंतरही जगदीश मुळीक नाराज नसल्याचे दिसून आले. त्यांनी यासंदर्भात एक पोस्ट टाकली. त्यात जनतेच्या सेवेत कायमच. कोणतेही पद नसतानाही माझ्यासाठी जनतेने कार्यकर्त्यांने दाखवलेले प्रेम पाहून कायमच कृतज्ञ आहे. जनतेचे प्रेम आणि विश्वास पारदर्शक, स्वच्छ काम असेच कायम ठेवणे जबाबदारी असून ती निष्ठेने पार पाडणार. असेही त्यांनी सांगितले होते.
मा. आमदार श्री. जगदीश मुळीक यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट !!!
वडगाव शेरी विधानसभेचे मा. आमदार आणि पुणे भाजपाचे मा. शहराध्यक्ष श्री. जगदीश मुळीक यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुळीक कुटुंबियांकडून औक्षण आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. यावेळी… pic.twitter.com/fguHHqmKlF
— Murlidhar Mohol (Modi Ka Parivar) (@mohol_murlidhar) March 16, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“मोदींची गॅरंटी संविधानाला धोका, निवडणुकीपुर्वीच कॉंग्रेसचा भाजपवर हल्लाबोल
हेही वाचा..संपुर्ण देशात आचारसंहिता लागू ; निवडणुकीच्या काळात काय करावे , काय करू नये ? वाचा
हेही वाचा…लोकसभा निवडणुकांची घोषणा, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की..,
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीची घोषणा, महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ? वाचा सविस्तर