बीड : बीड लोकसभा मतदारसंघातून सलग दोनवेळा खासदार असलेल्या प्रितम मुंडे यांना डावलून भाजपने पंकजा मुंडे यांनी उमेदवारी दिली आहे. अजित पवार गटातील मंत्री धनंजय मुंडे देखील महायुतीत असल्याने पंकजा मुंडे यांची बीड लोकसभा मतदारसंघात अधिक ताकद निर्माण झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी देखील बीड लोकसभा मतदारसंघाबाबत मोठी रणनिती आखली आहे. अलिकडेच बीड लोकसभा मतदारसंघाबाबत शरद पवारांनी बैठक बोलावली होती. त्या बैठकीत शरद पवारांनी बीड लोकसभेवर चर्चा करत नवीन उमेदवार देण्याच्या हालचाली वाढल्या आहेत.
हेही वाचा…संभाजीनगरमध्ये खैरे-दानवे संघर्ष पेटणार ; लोकसभा उमेदवारीवरून अंबादास दानवे नाराज
बीड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून माजी मंत्री जयसिंग गायकवाड, डॉ. नरेंद्र काळे, प्रा. सुशीला मोराळे,. ईश्वर मुंडे आदी नेते तयारी करत आहेत. त्यांचे भेटीगाठींचेही सत्र सुरूच आहे. पक्षाऐवजी बाहेरचा चेहरा रिंगणात उतरवायचा व पक्षाची ताकद मागे उभी करायची असे गणित शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मांडले जात आहे. अशातच आता शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे ज्योती मेटे यांनी बीडची उमेदवारी दिली तर अनेक बदल याठिकाणी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“फक्त उमेदवारी जाहीर होऊ द्या, मग पुणेकरांचे मोहोळ उठेल”, धंगेकरांनी मोहोळांना दिला इशारा
गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजला. त्यावरून शरद पवार ज्योती मेटे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत. कारण विनायक मेटे यांनी देखील मराठा आरक्षणासाठी लढा उभारला होता. मात्र त्यांचा अपघाती निधन झाल्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा तसाच राहिला आहे. यातच मराठा समाजाही रोष सध्या राज्य सरकारवर आहे अन् याचाच फायदा शरद पवार घेण्याच्या तयारीत आहे.
ज्योती मेटे यांना लोकसभेची उमेदवारी देऊन मराठा समाजाचं मत आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न शरद पवार करण्याची शक्यता आहे. मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष जरी महायुतीचा भाग असला तरी त्याला महायुतीत दुय्यम स्थान दिलं गेलं आहे. त्यामुळे ज्योती मेटे यांना बीडमधून लोकसभेची उमेदवारी देऊन संपुर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाचं मत आपल्याकडे वळवण्याचा शरद पवार डाव आखत असल्याचीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“खैरेंसाठी नाही तर ठाकरेंसाठी काम करतोय, दानवेंनी सगळंच सांगितलं,”
हेही वाचाराज्यात आणखी काका-पुण्याचा संघर्ष, “महादेव जानकरांविरोधात पुतण्यानेच दंड थोपडले”
हेही वाचा….“भाजपच्या मिशन ४५ ला मराठा समाज सुरूंग लावणार,” जरांगे पाटलांनी फडणवीसांना दिला ‘हा’ इशारा
हेही वाचा..साताऱ्यातून उदयनराजेंचा पत्ता कट होणार का ? चर्चांना उधाण, तर कार्यकर्ते आक्रमक
हेही वाचा…महायुतीतच तणावाचे १० लोकसभा मतदारसंघ ; जागावाटपाचा फॉर्म्युला अडला, दिल्लीत होणार अंतिम निर्णय