पुणे : माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा रणजितसिहं निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून माढा लोकसभेची जागा ही शरद पवारांना मिळण्याची शक्यता आहे. यातच माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर यांनी निवडणुक लढावी असा आग्रह शरद पवारांनी धरला आहे. जानकर यांनी देखील माढा आणि परभणी लोकसभेतून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र आता माढा लोकसभेत महादेव जानकर यांना त्यांच्याच पुतण्याने मोठे आवाहन दिले आहे.
हेही वाचा….कॉंग्रेसच्या उमेदवारांची आज घोषणा तर शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची घोषणा सोमवारी
बारामतीत काका पुतण्याचा वाद सगळ्या देशाला माहिती झाला आहे. दुसऱ्या बाजूला नागपुरमध्ये राष्ट्रवादीचे माजी मंत्री अनिल देशमुख आणि भाजपचे नेते आशिष देशमुख यांच्यात संघर्ष सुरू आहे. आता याचीच प्रचिती माढा लोकसभा निवडणुकीतही दिसू लागला आहे. राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर यांना त्यांचेच पुतणे स्वरूप जानकर यांनी ललकारलं आहे.
हेही वाचा…ते तर… ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’, शिवसेना शिंदेंचे १२ आमदार ठाकरेंकडे जाणार नाहीत
स्वरूप जानकर म्हणाले की, जानकर साहेबांनी परभणीतून लढावं, उत्तर प्रदेशातील मिर्जापुरमधून लढावं आमची यावर कोणतीही हरकत नाही. त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा. मात्र माढा लोकसभा मतदारसंघातून त्यांना लढायचं असेल तर आणि घरगुती संघर्ष नको असेल तर सुसंवाद करावा आणि चर्चा करून त्यांचं म्हणणं पटवून द्यावं. जर तर हे करू शकले नाही तर माझी उमेदवारी अटळ आहे. असे आवाहन स्वरूप जानकर यांनी केलं आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून महादेवस जानकर हे महाविकास आघाडीकडून माढा लोकसभेत निवडणुक लढणार अशी चर्चा सुरू आहे. याच दरम्यान महादेव जानकर यांनी शरद पवारांचीही यासंदर्भात भेट घेऊन चर्चा केली आहे. मात्र जानकर यांनी अद्यापही कोणताही निर्णय घेतलेला नाही. अशातच आता जानकर यांना निवडणुक लढायची असेल तर त्यांनी माझ्याशी सुसंवाद साधावा अन्यथा माढ्यातही संघर्ष बघायला मिळेल, असा इशारा स्वरूप जानकर यांनी दिलाय.
READ ALSO :
हेही वाचा….“भाजपच्या मिशन ४५ ला मराठा समाज सुरूंग लावणार,” जरांगे पाटलांनी फडणवीसांना दिला ‘हा’ इशारा
हेही वाचा..साताऱ्यातून उदयनराजेंचा पत्ता कट होणार का ? चर्चांना उधाण, तर कार्यकर्ते आक्रमक
हेही वाचा…महायुतीतच तणावाचे १० लोकसभा मतदारसंघ ; जागावाटपाचा फॉर्म्युला अडला, दिल्लीत होणार अंतिम निर्णय
हेही वाचा…संभाजीनगरमध्ये खैरे-दानवे संघर्ष पेटणार ; लोकसभा उमेदवारीवरून अंबादास दानवे नाराज
हेही वाचा“फक्त उमेदवारी जाहीर होऊ द्या, मग पुणेकरांचे मोहोळ उठेल”, धंगेकरांनी मोहोळांना दिला इशारा