सातारा : भाजपच्या पहिल्या निवडणुकी यादीत नाव न आल्याने सातारा मतदारसंघाचे विद्यमान खासदार उदयन राजे भोसले यांचे कार्यकर्ते चांगलचे आक्रमक झाले आहेत. सातारा मतदारसंघातून तुम्ही अपक्ष म्हणून लढा, असा उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांचा सुर दिसून येत आहे. याच संपुर्ण घडामोडीवर आता उदयनराजे भोसले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“मोदींची ‘ती’ पोस्ट डिलीट करा अन्यथा…”, भाजपने शरद पवार गटाला दिली धमकी
महायुतीमध्ये तीन पक्ष एक६ आले आहेत. प्रत्येकाला वाटते की मला तिकीट मिळाले पाहिजे आणि ते रास्त असून त्यामध्ये चुकीचं काहीही नाही. मी काही सन्यांस घेणार नाही. असे सुचक वक्तव्य भोसले यांनी केले आहे. त्यामुळे सातारा लोकसभेला उदयनराजे वेगळी भूमिका घेणार का ? अशा चर्चा सुरू आहे. याबाबत विचारले असता माझ्याकडे तिकीट आहे, प्लेन तिकीट आहे, ट्रेनचं तिकीट आहे. पिक्चरचं तिकीट आहे. बसचं तिकीट आहे. मात्र इतर तिकीटाचं मला काही माहिती नाही. असेही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“रोहिणी खडसे रावेर लोकसभा मतदारसंघातून लढणार नाही”, एकनाथ खडसे काय काय म्हणाले ?
दरम्यान, महाविकास आघाडीकडून सातारा लोकसभेची जागा ही शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे. याठिकाणी विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. तर महायुतीकडून सातारा लोकसभेसाठी अजित पवार गट आग्रही आहे. अजित पवार गटाकडून रामराजे निंबाळकर यांनी निवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे उदयन राजेंचा पत्ता कट होणार का ? अशी सुद्धा चर्चा रंगली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे भाजपमध्ये नाराज आहेत का ? अशीही चर्चा सुरू आहे.
READ ALSO :
हेही वाचा…महायुतीतच तणावाचे १० लोकसभा मतदारसंघ ; जागावाटपाचा फॉर्म्युला अडला, दिल्लीत होणार अंतिम निर्णय
हेही वाचा…संभाजीनगरमध्ये खैरे-दानवे संघर्ष पेटणार ; लोकसभा उमेदवारीवरून अंबादास दानवे नाराज
हेही वाचा“फक्त उमेदवारी जाहीर होऊ द्या, मग पुणेकरांचे मोहोळ उठेल”, धंगेकरांनी मोहोळांना दिला इशारा
हेही वाचा..कॉंग्रेसच्या उमेदवारांची आज घोषणा तर शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची घोषणा सोमवारी
हेही वाचाते तर… ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’, शिवसेना शिंदेंचे १२ आमदार ठाकरेंकडे जाणार नाहीत