नागपुर : राज्यात लोकसभा निवडणुकांचा उद्यापासून बिगूल वाजणार आहे. त्याआधी राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी आपल्या प्रचाराला सुरूवात केली आहे. तर उमेदवारांची घोषणा येत्या दोन ते तीन दिवसात होण्याची शक्यता आहे. यातच शिंदे गटातील १२ आमदार ठाकरे गटात परतणार असल्याचा दावा वकिल असीम सरोदे यांनी केला आहे. त्यामुळे ऐननिवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलंय.
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीचा उद्या बिगूल वाजणार, महाराष्ट्राकडे विशेष लक्ष
बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे व त्यांच्या सोबत असणाऱ्या लोकांना आजही दिवास्वप्न पडते, याचेच आश्चर्य आहे मुख्यमंत्री एकनाथ शिदे उत्कृष्ठपणे सरकार चालवत आहेत. एवढ्या चांगल्या सरकारमधील आमदारांना परत जाण्याची शक्यता नाहीच. महायुतीमध्ये असणारे शिवसेनेचे आमदार परत उद्धव ठाकरेंकडे जाणार नाहीत. विशेष म्हणजे, असा विचार करणेही ” मुंगेरीलाल के हसीन सपने ” म्हटले पाहिजे, असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.नागपूर येथे ते माध्यमांशी संवाद साधत होते.
हेही वाचा…मोठी बातमी..! 2024 च्या लोकसभा निवडणुकांची उद्या घोषणा होणार, हालचाली वाढल्या
भाजपाने २० जागा जाहीर केल्या आहेत. उमेदवारांचा प्रचाराबाबत चर्चा करण्यासाठी बैठक होणार आहे. ५१ टक्के मते कशी मिळतील यासाठी नियोजन करणार आहोत. ज्या जागांवर एकमत झाले आहे, त्या जागा घोषित करण्याची सहकारी पक्षांना मुभा आहे. महायुतीचे तिन्ही नेते एकत्र येतील व लवकरच उर्वरित जागांवर एकमत होईल. भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जागा भाजपाच्याच आहेत त्यावर भाजप-महायुती एकत्र लढणार, असेही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“मोदींची ‘ती’ पोस्ट डिलीट करा अन्यथा…”, भाजपने शरद पवार गटाला दिली धमकी
हेही वाचा…“रोहिणी खडसे रावेर लोकसभा मतदारसंघातून लढणार नाही”, एकनाथ खडसे काय काय म्हणाले ?
हेही वाचा..“पुण्यामध्ये वॉशिंग मशीन नकोच ; माझंही तेच मत ,” शरद पवारानंतर राऊतांची मोरेंनी घेतली भेट
हेही वाचा..“शिंदे गटात राजकीय भुकंप, शिंदेंचे १२ आमदार पुन्हा ठाकरेकडे जाणार “?
हेही वाचा…तर पुणे लोकसभेची लढत तगडी होणार ; कॉंग्रेसकडून बडा नेता निवडणुकीच्या रिंगणात