नवी दिल्ली : देशातील २०२४ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक उद्या जाहीर होणार आहे. यासंदर्भात उद्या निवडणुक आयोगाची दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे निवडणुक आयोगाने उद्या निवडणुकांची घोषणा केल्यानंतर संपुर्ण देशात आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ज्याची आपण वाट पाहत होतो. त्या लोकसभा निवडणुकाचा आता प्रत्यक्षात बिगूल वाजणार आहे.
हेही वाचा…कॉंग्रेसकडून भाजपचा भांडाफोड, राहुल गांधींचा ‘तो’ व्हिडीओ भाजपच्या अंगलट, चांगलचं सुनावलं
गेल्या वेळी २०१९ मध्ये सार्वत्रिक निवडणुकांची तारिख १० मार्च रोजी जाहीर करण्यात आली होती. तर ११ एप्रिल ते १९ मे दरम्यान टप्प्याटप्प्याने लोकसभा निवडणुकांचा एकूण सात टप्प्यात कार्यक्रम पार पडला होता. यातच ६७.१ टक्के मतदान झालं होतं. तर त्याची मतमोजणी २४ मे रोजी करण्यात आली होती. त्यामुळे या निवडणुकांचा कार्यक्रम कसा असणार ? याची सविस्त माहिती निवडणुक आयोग उद्या देणार आहे. यावेळी निवडणुकीत सुमारे ९७ कोटी लोक मतदान करणार आहेत.
राज्यात सध्या झालेल्या पक्ष फुटीमुळे लोकसभा निवडणुकीला अधिक महत्व प्राप्त झालं आहे. सुरूवातीला शिवसेना अन् त्यानंतर राष्ट्रवादीत मोठे बंड झालं आणि महत्वाचे नेते पक्षातून निघून गेलेत. तर निवडणुक आयोगाने देखील चिन्ह आणि पक्षनाव मुळ व्यक्तीला न देता दुसऱ्या व्यक्तीला देण्याचा निर्णय घेतला. यामुळे राज्यात या निवडणुकीला मोठं महत्व आहे.
हेही वाचा..बारामतीप्रमाणेच ‘या’ ठिकाणीही होणार भावजय-विरूद्ध नणंद सामना, शरद पवारांनी घोषीत केला उमेदवार
दरम्यान, पक्ष फुट झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संपुर्ण महाराष्ट्रात दौरे सुरू केले आहे. तर दुसऱ्या बाजूला शरद पवार यांना देखील मोठ्या प्रमाणात दुसऱ्या पक्षातील नेते भेट घेतांना दिसत आहेत. राज्यात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार असून जनता कुणाच्या बाजूने मतदान करणार ? ठाकरे आणि पवारांना सहानुभूतीचा फायदा होणार का ? त्याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी..! 2024 च्या लोकसभा निवडणुकांची उद्या घोषणा होणार, हालचाली वाढल्या
हेही वाचा.ठाकरे गटाला मोठा धक्का, अनेक पदाधिकारी शिंदे गटात दाखल
हेही वाचा..“लोकसभा, विधानसभा एकत्र घेता येतील,” एक देश एक निवडणुकीबाबत राष्ट्रपतीकडे अहवाल सादर, राजकीय हालचाली वाढल्या
हेही वाचा..“लोकसभा, विधानसभा एकत्र घेता येतील,” एक देश एक निवडणुकीबाबत राष्ट्रपतीकडे अहवाल सादर, राजकीय हालचाली वाढल्या
हेही वाचा…निवडणुकीपुर्वीच महायुतीत खळबळ, उमेदवारीसाठी महायुतीत ‘हा’ खासदार बंडाच्या तयारीत