कोल्हापूर : महायुतीमध्ये कोल्हापुरमध्ये उमेदवार बदलाच्या हालचाली सुरू असताना विद्यमान खासदार संजय मंडलिक हे बंडाच्या तयारीत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष लढा, असा सुर कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. त्यामुळे निवडणुकीपुर्वीच महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. यातच आज सायंकाळी कार्यकर्ता मेळावा होत असून या मेळाव्यात सगळी रणनिती ठरली जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“मागच्या निवडणुकीत एबी फॉर्म भरला, पक्षाने तिकीट कापलं” मात्र 2024 साली स्मिता वाघांना निष्ठेचं फळ
कोल्हापुर जागेसाठी महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज यांचं नाव जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे महायुतीकडूनही राजे घराण्यातूनच उमेदवारी देण्यात यावी, असा सुर असताना भाजपचे नेते समरजीत घाटके यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे विद्यमान खासदार संजय मंडलीक आता बंड करण्याच्या तयारी असल्याची माहिती समोर येत आहे. आज सायंकाळी चार वाजता मेळावा होत आहे.
हेही वाचा..‘अहमदनगर’ शहराचं नाव बदललं, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
मंडलिक गटाकडून महायुतीकडून आपल्याला उमेदवारी मिळावी, असा दावा केला जात आहे. परंतु महायुतीकडून घाटके यांचा विचार सुरू आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीच आता संजय मंडलिक मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करणार असल्याची माहितीही समोर येत आहे. त्यामुळे कोल्हापुर मध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं दिसून येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…कॉंग्रेसकडून भाजपचा भांडाफोड, राहुल गांधींचा ‘तो’ व्हिडीओ भाजपच्या अंगलट, चांगलचं सुनावलं
हेही वाचा..बारामतीप्रमाणेच ‘या’ ठिकाणीही होणार भावजय-विरूद्ध नणंद सामना, शरद पवारांनी घोषीत केला उमेदवार
हेही वाचा..वसंत मोरे शरद पवार गटाच्या वाटेवर, लवकरच पार पडणार पक्ष प्रवेश सोहळा ?
हेही वाचाकोर्टाने अजित पवारांना फटकारलं, आव्हाडांनी डिवचलं, म्हणाले, काका का हे आता चांगलचं…
हेही वाचा..शरद पवारांची नाशकात मोठी खेळी, भाजपच्या ‘या’ माजी खासदाराला मैदानात उतरवणार