पुणे : पुण्यातील मनसेचे माजी नगरसेवकर वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे यांना आतापर्यंत शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि कॉंग्रेसकडून पक्षात येण्याची ऑफर देण्यात आली आहे. मात्र यावर वसंत मोरे यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. येत्या दोन ते तीन दिवसात राजकीय भूमिका पुढील काही दिवसात घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यातच वसंत मोरे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. यातच वसंत मोरे यांचा लवकरच पक्ष प्रवेश होणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…“मित्रपक्षांच्या नेत्यांना ‘स्वाभिमान गहाण टाकला की गुलामी पत्करावीच लागते’” शिंदे अन् अजित पवारांना जोरदार टोला
मनसेला सोडचिठ्ठी देण्याच्या अगोदर वसंत मोरे यांनी निसर्ग मंगल कार्यालय येथे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती. मात्र ही भेट कामानिमित्ताने घेतली असल्याची प्रतिक्रिया मोरे यांनी दिली. मात्र त्याच्या काही दिवसानंतर लगेचच वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. यातच मोरे यांनी लोकसभा निवडणुक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याच पार्श्वभूमीव वसंत मोरे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…“शांतिगिरी महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर विरोधकांना नक्कीच घाम फुटणार ?” कारण ही आलं समोर
दरम्यान, पक्षांतर्गत राजकीय कुरघोडीमुळे मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. यातच रूपाली पाटील यांनी मोरे यांना अजित पवार गटात येण्याची विनंती केली आहे. तर दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसचे नेते मोहन जोशी यांनी मोरेंची भेट घेत त्यांना कॉंग्रेस पक्षात येण्याची ऑफर दिली. तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वसंत मोरे यांना फोन केला आहे. मात्र मोरे यांनी यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.
यातच आज वसंत मोरे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आले आहेत. शरद पवारांच्या भेटीनंतर वसंत मोरे काय निर्णय घेणार तेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचाकोर्टाने अजित पवारांना फटकारलं, आव्हाडांनी डिवचलं, म्हणाले, काका का हे आता चांगलचं…
हेही वाचा..शरद पवारांची नाशकात मोठी खेळी, भाजपच्या ‘या’ माजी खासदाराला मैदानात उतरवणार
हेही वाचा…“मागच्या निवडणुकीत एबी फॉर्म भरला, पक्षाने तिकीट कापलं” मात्र 2024 साली स्मिता वाघांना निष्ठेचं फळ
हेही वाचा..‘अहमदनगर’ शहराचं नाव बदललं, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
हेही वाचा.*“काल मनसेला जय महाराष्ट्र, आज वसंत मोरेंना ३ मोठ्या पक्षांची ऑफर”, कोणत्या पक्षात जाणार ?*