मुंबई : राष्ट्रवादी पक्षनाव आणि निवडणुक चिन्हांबाबत सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा सुनावणी पार पडली. या सुनावणीत शरद पवारांचं नाव आणि फोटो वापरू नयेत. असे स्पष्ट आदेश अजित पवार गटाला दिलेत. तसेच जर आत्मविश्वास असेल तर स्वत: ची ओळख निर्माण करा आणि मते मिळवा, असे म्हणत चांगलचा फटाकरलं. यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर सडकून टिका केलीय.
हेही वाचा…“शांतिगिरी महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर विरोधकांना नक्कीच घाम फुटणार ?” कारण ही आलं समोर
राजकारण म्हणजे फक्त बेरजेचे गणित नसते. लोकांमध्ये जाऊन, जमिनीवर काम करून स्वत:ची ओळख निर्माण करावी लागते. राजकीय आणि सामाजिक जीवनात नितीमत्ता जपावी लागते. तुमच्या कृतीने तुम्ही स्वत:ची स्वत:च्या अंगावर शिंतोडे उडवून घेतले आहेत. ‘या वयात’ही तुमच्याकडे स्वत:ची ओळख नाही. आमच्या बापाने निर्माण केलेला आणि वाढवलेल्या पक्षावर तुम्ही हक्क सांगताय. आजपर्यंत लोकं तुम्हाला तुमचं अस्तित्त्व विचारत होती, आज सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. ‘काका का?’ हे आता यांच्या चांगलं लक्षात आलं असेल. असेही म्हणज आव्हाडांनी अजित पवारांना डिवचलं आहे.
हेही वाचा…“सुळे, सुनेत्रा पवार अन् शिवतारेंसह मैदानात, बारामतीच्या रिंगणात आणखी एक ओबीसी चेहरा उतरणार
दरम्यान, आम्हाला लिहून द्या की तुम्ही शरद पवारांचा फोटो आणि नाव वापरणार नाही. शरद पवार हे राजकारणातील उत्तुंग व्यक्तीमत्त्व आहे, त्यांच्या नावाने इतकी वर्ष तुम्ही निवडणुका जिंकल्या आहे. परंतु आता तुम्ही तुमची वेगळी चूल मांडली आहे, तर शरद पवारांचं गुडविल वापरू नका. आत्मविश्वास असेल तर स्वत:ची ओळख निर्माण करा आणि मते मिळवा असे मत कोर्टाने मांडले.
READ ALSO :
हेही वाचा..शरद पवारांची नाशकात मोठी खेळी, भाजपच्या ‘या’ माजी खासदाराला मैदानात उतरवणार
हेही वाचा…“मागच्या निवडणुकीत एबी फॉर्म भरला, पक्षाने तिकीट कापलं” मात्र 2024 साली स्मिता वाघांना निष्ठेचं फळ
हेही वाचा..‘अहमदनगर’ शहराचं नाव बदललं, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
हेही वाचा.*“काल मनसेला जय महाराष्ट्र, आज वसंत मोरेंना ३ मोठ्या पक्षांची ऑफर”, कोणत्या पक्षात जाणार ?*
हेही वाचा…“मित्रपक्षांच्या नेत्यांना ‘स्वाभिमान गहाण टाकला की गुलामी पत्करावीच लागते’” शिंदे अन् अजित पवारांना जोरदार टोला