पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीची इच्छा व्यक्त केल्यानंतर पक्षाकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नसल्याने माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी मनसेची साथ सोडली. काल पत्रकार परिषद घेऊन वसंत मोरे यांनी मनसेत असलेल्या राजकीय कुरघोडीबाबतही मोठं भाष्य केले. आपल्या भावना मोकळ्या करतांना वसंत मोरे चांगलेच भावूक झाल्याचेही दिसून आले. तर आता वसंत मोरे यांना अनेक पक्षांकडून ऑफर येत आहेत.
हेही वाचा…“तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार ;” नाशिकसाठी शांतिगिरी महाराजांनी शड्डू ठोकला
आगामी लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून वसंत मोरे इच्छूक आहेत. परंतु मनसेने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर मोरेंनी मनसेला अखेर जय महाराष्ट्र केला. यातच काल राजीनामा दिल्यानंतर येत्या दोन ते तीन दिवसात आपली राजकीय भूमिका जाहीर करणार असेही मोरे यांनी म्हटले आहे. त्याआधी वसंत मोरे यांना विद्यमान खासदार संजय राऊत यांचा देखील फोन येऊन गेला आहे.
हेही वाचा..“सातारा आपलाच, कामाला लागा,” अजित पवारांनी लोकसभेसाठी कार्यकर्त्यांना दिल्या महत्वाच्या सूचना
राजीनामा देण्याच्या आधी वसंत मोरे यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांची देखील भेट घेतली होती. त्यामुळे वसंत मोरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाणार का ? अशीही चर्चा सुरू आहे. तर आज कॉंग्रेसचे नेते मोहन जोशी यांनी देखील वसंत मोरे यांची भेट घेऊन कॉंग्रेसमध्ये येण्याची विनंती केली. तर अजित पवार गटाच्या नेत्या आणि माजी नगरसेविका रूपाली पाटील यांनी देखील वसंत मोरे यांना अजित पवार गटात येण्याची ऑफर दिली आहे. परंतु अद्यापही कोणत्याही पक्षात न जाण्याचा निर्णय मोरे यांनी घेतला आहे. तर लोकसभा निवडणुक लढवायची की नाही ? ते पुण्यातील जनता ठरवणार असेही त्यांनी सांगितले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मित्रपक्षांच्या नेत्यांना ‘स्वाभिमान गहाण टाकला की गुलामी पत्करावीच लागते’” शिंदे अन् अजित पवारांना जोरदार टोला
हेही वाचा..“शांतिगिरी महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर विरोधकांना नक्कीच घाम फुटणार ?” कारण ही आलं समोर
हेही वाचा…“सुळे, सुनेत्रा पवार अन् शिवतारेंसह मैदानात, बारामतीच्या रिंगणात आणखी एक ओबीसी चेहरा उतरणार
हेही वाचा.मोठी घोषणा..! तिरंगी लढतीचा फटका अजित पवारांना बारामतीत बसणार ? विजय शिवतारे अपक्ष म्हणून निवडणूक लढणार
हेही वाचाइकडे राहुल गांधींची भारत जोडो महाराष्ट्रात ; तिकडे कॉंग्रेसचा बडा नेता भाजपच्या गळाला