सातारा : ज्या ठिकाणी ज्या पक्षाचे विद्यमान खासदार आहेत, त्या जागा ज्या त्या पक्षाला सोडायची, अशी प्राथमिक चर्चा झाली आहे. साताऱ्याची जागा आपल्यालाच मिळणार आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची तालुकानिहाय आणि बुथनिहाय मेळावे घेऊन कामाला सुरूवात करावी, अशी सुचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या.
हेही वाचा…“शरद पवारांकडून ‘वसंत मोरें’नी मार्गदर्शन घेतलं असेल तर चुकीचे काय ?”
महायुतीत अजूनही जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाहीय. परंतु गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सातत्याने जागावाटपाबाबत चर्चा महायुतीत सुरू आहे. अशातच २०१९ च्या जिंकलेल्या जागा त्या त्या पक्षाला मिळणार अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे. त्यामुळे अजित पवार गटाला बारामतीसह, शिरूर, रायगड आणि साताऱ्याची जागा मिळणार आहे. त्याच अनुषंगाने अजित पवारांनी सातारा लोकसभेसाठी तयारी करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहे.
हेही वाचा..संभाजीनगरची जागा ठाकरे गटाकडे..! ठाकरेंकडून थेट प्रचार करण्यास सुरूवात, उद्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन
अजित पवार म्हणाले की, लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात दिल्लीत काल बैठक होणार होती, भाजपचे पार्लमेंटरी बोर्ड जागावाटपासंदर्भात चर्चेसाठी बसणार होते. त्यामुळे कालची बैठक ही पुढे ढकलली आहे. ती आज किंवा उद्या होऊ शकते. जागावाटपासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि भाजप आम्ही तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून प्राथमिक चर्चा केलीय. त्यात बहुतेक सिटिंग जागा त्या-त्या पक्षाला सोडायची अशी प्राथमिक चर्चा झालेली आहे. असेही अजित पवार म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“मी कॉंग्रेसची, अन् कॉंग्रेसच्याच तिकीटावर निवडणुक लढणार”, चंद्रपुरात कॉंग्रेसमध्येच पेच वाढला
हेही वाचा..श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर, महायुतीत पेच वाढला, भाजप काय निर्णय घेणार ?
हेही वाचा…“राष्ट्रवादीकडून श्रीरंग बारणेंची कोंडी, मावळवर राष्ट्रवादीचा दावा, कार्यकर्ते सरसावरले”
हेही वाचा…“शिवतारेंना आवरा नाहीतर कल्याणमध्येही चित्र दिसेल”, शिंदे अन् अजित पवार गटाचे नेते एकमेकांत भिडले
हेही वाचा“आधी भ्रष्टाचारी म्हणत होते, त्यांनी मोदींना राखी बांधली”, ठाकरेंनी भावना गवळींसह भाजपचा घेतला समाचार