छत्रपती संभाजीनगर : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. परंतु त्याआधीच महाविकास आघाडीकडून छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाने प्रचार सुरू केला आहे. यातच उद्या सकाळी ठाकरे गटाच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन होणार असल्याने याठिकाणी उमेदवार कोण असणार ? त्याची आता जोरदार चर्चा सुरू झालीय.
हेही वाचा…“अजित पवारांवर केलेली टिका शिवतारेंच्या जिव्हारी.,” महायुतीच्या नेत्यांकडून शिवतारेंना दिली समज
ठाकरे गटाकडून दिलेल्या माहितीनुसार उद्या दिनांक १३ मार्च २०२४ बुधवारी सकाळी १० वाजता शहरातील समर्थनगर येथे छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणूक निमित्त शिवसेना प्रचार कार्यालयाचे स्तंभ पुजन करण्यात येणार आहे. त्यानंतर या प्रचार कार्यालयाचे काम सुरू होणार आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हा कार्यालय उभारला जाणार आहे. त्याच ठिकाणी दरवेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे लोकसभा निवडणुकीचं प्रचार कार्यालय पाहायला मिळत आहे.
हेही वाचा…“सरकारकडून महिलांची कुचेष्ठा, फुकडच्या साड्या दिल्या पण…” विरोधकांकडून संताप
महाविकास आघाडीकडून छत्रपती संभाजीनगरची जागा ही ठाकरे गटाला मिळणार आहे. या मतदारसंघातून ठाकरे गटाकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याआधी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नावाचीही चर्चा अलिकडे सुरू होती. मात्र उद्या होणाऱ्या कार्यलायचं उद्घाटन हे खैरे यांच्या कार्यालयाजवळच असल्याने खैरेंची उमेदवारी पक्की मानली जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“‘मी माझ्या स्वत:च्या हातांनी परतीचे दोर कापले’” वसंत मोरे पत्रकार परिषदेत ढसाढसा रडले
हेही वाचा“वसंत मोरे भाऊ तुझी लढाई चालू ठेव ; तुझ्यासाठी बहिनीचे दरवाजे कायम खुले,” रूपाली पाटलांची पोस्ट व्हायरल
हेही वाचा.मनसेने पुण्यातला हिरा गमावला..! वसंत मोरे यांचा मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र
हेही वाचा…हरियाणात मोठा भुंकप..! तिकडे एवढासा पक्ष स्वाभिमान दाखवतो, अन् इकडे लोक मुंबई ते दिल्ली विमानाचा डेलीपास काढून बसलेत
हेही वाचा..“लोकसभेपुर्वी मोठा भुंकप, ‘या’ राज्यात भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनामा, राजकीय हालचाली वाढल्या”