पुणे : काल शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बारामतीत दोन्ही पवारांना पाडण्याची भाषा केली होती. त्याचबरोबर महायुतीत असलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात देखील विजय शिवतारे यांनी थंड थोपडले होते. यातच बारामतीत अपक्ष म्हणून निवडणुक लढणार असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर विजय शिवतारे यांच्या वक्तव्याचे पडसाद काल दिवसभर उमटतांना दिसले. यातच आज महायुतीच्या नेत्यांकडून विजय शिवतारे यांना समज देण्यात आली असून महायुतीत असल्यामुळे वादग्रस्त वक्तव्य टाळा, अशा सुचना देखील शिवतारेंना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा…ठाकरेंची सांगलीत ताकद वाढली, डबल महाराष्ट्र केसरी ठाकरे गटात दाखल, निवडणुकीच्या रिंगणात उतरणार
विजय शिवतारे यांनी काल अजित पवारांवर थेट टिका करत बारामतीत दोन्ही पवारांना पाडा. तसेच अजित पवारांनी केलेल्या अपमानाचा बदला घेण्याची वेळ आलीय. अजित पवार हे नालायकपणाचं लक्षण आहे. अशी जहरी टिका विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर केली होती. त्यानंतर अजित पवार गटाकडून विजय शिवतारे यांचा चांगलाच समाचार घेण्यात आला. तर आज महायुतीच्या काही नेत्यांकडून विजय शिवतारे यांच्यावर नाराजी व्यक्त करत महायुतीत असल्यामुळे वादग्रस्त वक्तव्य टाळा, अशा सुचनाही शिवतारे यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विजय शिवतारे आता याकडे कशा पद्धतीने पाहतात ? ते पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा….‘निवडणुकीला उभं राहू नका, भाजपकडून विरोधी नेत्यांना धमकी,” शरद पवारांचा भाजपवर गंभीर आरोप
दरम्यान, २०१९ च्या निवडणुकीत अजित पवार यांनी थेट विजय शिवतारे यांना धमकी दिली होती. विजय शिवतारे तु कसा निवडून येतो ते पाहतोच, असे म्हणत विजय शिवतारे यांना अजित पवारांनी निवडणुकीत धुळ चारली होती. महायुतीत अजित पवार सामील झाल्यानंतर विजय शिवतारे यांनी अजित पवारांची मध्यंतरी भेट घेतली होती. या भेटीत आपला जुना वाद संपुष्टात आल्याचे संकेत शिवतारे यांनी दिले होते. परंतु कालच त्यांनी पुन्हा एकदा अजित पवारांना बारामतीत पाडण्याची भाषा केल्याने याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झालीय.
READ ALSO :
हेही वाचा…“सरकारकडून महिलांची कुचेष्ठा, फुकडच्या साड्या दिल्या पण…” विरोधकांकडून संताप
हेही वाचाभाजपची दुसरी यादी..! लोकसभेसाठी मुंडे, मुनगंटीवार अन् भारती पवारांच्या नावांची घोषणा होणार ?
हेही वाचा…“ज्या दिवशी भाजपला धोका देईल, त्या दिवशी….” महादेव जानकरांनी पुन्हा भाजपला दिला इशारा
हेही वाचाशिंदे साहेब शिवतारेंना आवरा, अजित पवारांवर केलेली टिका राष्ट्रवादीला भोवली
हेही वाचा.मराठा आंदोलनाबाबत SIT स्थापन, नाशिकचे पोलिस आयुक्त करणार चौकशी, महत्वाची माहिती येणार समोर