मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने चांगलीच पक्ष बांधणी करण्यास सुरूवात केलीय. यातच महाविकास आघाडीकडून सांगली लोकसभा मतदारसंघ हा ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आजे शिवसेना ठाकरे गटात पक्ष प्रवेश केलाय. त्यामुळे सांगली जिल्ह्यात आता ठाकरे गटाची मोठी ताकद वाढली आहे.
हेही वाचा…शिंदेंच्या आणखी एका खासदाराचा पत्ता कट होणार ; नाशिकमधून शांतिगिरी महाराज लोकसभेच्या मैदानात ?
आज पाचशे गाड्यासह चंद्रहार पाटील यांनी शक्तिप्रदर्शन करत मातोश्रीवर जाऊन ठाकरेंच्या हातून शिवबंधन बांधून घेतले. यावेळी सांगली लोकसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर कार्यकर्त्यांकडून अब की बार चंद्रहार अशी घोषणा देण्यात आली. यावेळी ठाकरे गटातील नेत्यांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा…लोकसभेला सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उभे करणार हजारो मराठा उमेदवार ; पुणे जिल्ह्यात ठराव मंजूर
मातोश्रीवर यावेळी चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना गदा भेट दिली. यावेळी ठाकरे म्हणाले की, लोकांनी ठरवलंय आहे की त्याला मी काय संकेत देणार. जनतेनं एकदा संकेत दिल्यानंतर त्या पलिकडे काय संकेत द्यायचे, त्याच्यामुळे ही गदा आणि मशाल हे दोन्ही मर्दाच्या हातात शोभतात. हीच गदा आणि मशाल घेऊन आपल्याला एक मर्द दिल्लीत पाठवायचा आहे. लवकरच सांगलीत येणार आहे. पुर्ण महाराष्ट्रातील गद्दारांना आडवं करायचे आहे. हुकूमशाही विरूद्ध लढताना तुमच्यासारखे तरणेबाज मर्द पहिलवान शिवसेनेत आले आहेत आणि भविष्य तुमच्या हातात आहे. जनता आपल्याकडे अपेक्षेनं बघते असल्याचे ठाकरे सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा..‘निवडणुकीला उभं राहू नका, भाजपकडून विरोधी नेत्यांना धमकी,” शरद पवारांचा भाजपवर गंभीर आरोप
हेही वाचा…निवडणुकीपुर्वी जळगावात भाजपला मोठा धक्का, ‘हा’ बडा नेता ठाकरे गटात दाखल
हेही वाचा.तटकरे, धनंज मुंडे, यांच्यासह राष्ट्रवादीचा एक गट भाजपात प्रवेश करणार, अजित पवारांना मोठा धक्का ?
हेही वाचा..पिंपरी-चिंचवडमधील भूमिपुत्रांचा प्राधिकरण परतावा प्रश्न अखेर सुटला, महेश लांडगे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश
हेही वाचा…“लंकेसाहेब तुमच्या खांद्यावर बंदुक ठेवली जातेय”, शरद पवार गटात पक्ष प्रवेशावर अजित पवार गटाची प्रतिक्रिया