जळगाव : आगामी लोकसभेसाठी राज्यात अजूनही कोणत्याही आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाहीय. परंतु त्याआधीच आता राज्यात मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहेत. अशातच जळगावमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. जळगाव भाजप लोकसभा समन्वय संघटक अॅड. ललिता पाटील यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातून त्यांना शिवबंधन बांधण्यात आलं आहे. यातच ललिता पाटील यांनी निवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त केलीय. त्यामुळे त्यांना निवडणुकीचं तिकिट दिलं जाणार का ? अशीही चर्चा सुरू झालीय.
हेही वाचा…शिवसेना पित्रा-पुत्रात होणार लोकसभेचा सामना, ठाकरेंनी जाहीर केली ‘या’ नेत्याची उमेदवारी
2009 मध्ये कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या अॅड. ललिता पाटील यांच्या म्हणण्यानुसार भाजपमध्ये गेल्या पाच वर्षात आपण प्रामाणिकपणाने काम करून देखील आपल्याला कोणतेही पद देण्यात आले नाही. भाजपच्या बैठकांना ही आपल्याला बोलविले जात नव्हते. सातत्याने आपल्याला डावलण्यात येत होते, असा आरोप ललित पाटील यांनी देखील केलाय.
हेही वाचा…दोन्ही पवारांना बारामतीत पाडणार, शिंदेंच्या शिवतारेंनी थेट अजित पवारांनाही दिलं चॅंलेज
ललिता पाटील यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलीय. याआधी डॉ. हर्षल माने, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांची नावे जळगाव लोकसभेसाठी चर्चेत असताना आता ठाकरे गट कोणाला उमेदवारी देतो ? याकडे सगळ्यांना लक्ष लागून राहिलंय. यातच जळगाव लोकसभेत ठाकरे गटाच्या उमेदवाराने किमान डिपॉझिट वाचवून दाखवावं. डिपॉडिट ते वाचवू शकत नाहीय. बाकी काय बोलायचं, अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाला आव्हान दिलंय.
READ ALSO :
हेही वाचा.तटकरे, धनंज मुंडे, यांच्यासह राष्ट्रवादीचा एक गट भाजपात प्रवेश करणार, अजित पवारांना मोठा धक्का ?
हेही वाचा..पिंपरी-चिंचवडमधील भूमिपुत्रांचा प्राधिकरण परतावा प्रश्न अखेर सुटला, महेश लांडगे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश
हेही वाचा…“लंकेसाहेब तुमच्या खांद्यावर बंदुक ठेवली जातेय”, शरद पवार गटात पक्ष प्रवेशावर अजित पवार गटाची प्रतिक्रिया
हेही वाचा..शिंदेंच्या आणखी एका खासदाराचा पत्ता कट होणार ; नाशिकमधून शांतिगिरी महाराज लोकसभेच्या मैदानात ?
हेही वाचा…लोकसभेला सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उभे करणार हजारो मराठा उमेदवार ; पुणे जिल्ह्यात ठराव मंजूर