मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता मैदानात उतरून प्रत्यक्ष प्रचार करण्यास सुरूवात केलीय. शिवसेना सोडून गेलेल्या बंडखोर उमेदवारांच्या विरोधात ठाकरेंनी मोठी रणनिती आखली आहे. यातच शिंदे गटातील विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांच्याविरोधात आता त्यांचेच पुत्र आमि युवा सेनेचे सरचिटणीस अमोल किर्तीकर यांना उमेदवारी ठाकरेंनी जाहीर केली आहे. त्यामुळे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात पित्रा-पुत्र असा सामाना होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…१ हजार ५० कोटींच्या विकासकामांचा ‘धम्माका’…,देवेंद्र फडणवीसांनी महेश लांडगे यांना दिले मोठं गिफ्ट
उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सांयकाळी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील अंधेरी पुर्व व जोगेश्वरी पुर्व, वर्सोवा व अंधेरी पश्चिम येथील चार विधानसभा क्षेत्रांतील चार शिवसेना शाखांना भेटी देत शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यानंतर अमोल किर्तीकर यांची उमेदवारी ठाकरेंनी या कार्यक्रमात जाहीर केली. जोगेश्वरी पुर्व विधानसभेत झालेल्या या भेटीच्या वेळी शिवसेना नेते व विभागप्रमुख अॅड. अनिल परब, शिवसेना नेते व विभागप्रमुक सुनील प्रभू, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, रश्मी ठाकरे तसेच शिवसैनिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा…“लोकसभेच्या निवडणुकीत माझी तुम्ही काळजी घ्या”, पंकजा मुंडेंच्या विधानानंतर राजकीय चर्चांना उधाण
दरम्यान, आघाडीच्या जागावाटपाची चर्चा अजून सुरू असतानाच ठाकरे यांनी परस्पर उमेदवारी जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यातच महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा निर्णय येत्या दोन ते तीन दिवसांत होण्याची शक्यता आहे. यातच मागच्या निवडणुकीत जिंकलेल्या जागा ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता असून त्याच आधारावर ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केल्याचीही चर्चा सुरू आहे.
READ ALSO :
हेही वाचादोन्ही पवारांना बारामतीत पाडणार, शिंदेंच्या शिवतारेंनी थेट अजित पवारांनाही दिलं चॅंलेज
हेही वाचा…“मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधी रुपयांच्या खर्चाचा पूर वाहिला, पण मंत्र्यांनी नाही पाहिला”
हेही वाचा“तु आता कोणत्याही बापाला समोर घेऊन आला तरी पराभव करू”, तानाजी सावंतांचा निंबाळकरांना इशारा
हेही वाचा…रविंद्र वायकर शिंदेंच्या शिवसेनेत दाखल, ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..”गद्दारांचं नशीब आहे की आज…”
हेही वाचा…“अजित पवारांना मोठा धक्का, पश्चिम महाराष्ट्रातील ‘हा’ बडा नेता शरद पवार गटात परतणार