मुंबई : मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर मोठा खर्च झाल्याची बाब समोर आली आहे. एका सर्व्हंट क्वार्टवर २ कोटींवर खर्च झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इलाखा शहर विभागाने दरवर्षी मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधींचा खर्च केल्याचा आरोप वें.ल. पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात लोकमतने बातमी दिली आहे. त्यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टिका केली आहे.
हेही वाचा…“900 एकरवर सभा, कोट्यवधी मराठे एकत्र येणार,” जरांगे पाटलांचा निवडणुकीपुर्वी सरकारला कडक इशारा
मागील सहा महिन्यांत शासकीय बंगल्यांवर ३० कोटींची काम काढल्याचा प्रकार समोर आला. यात अधिक माहिती घेतली असता २०२१-२२ व २०२२-२३ या दोन आर्थिक वर्षात मलबार हिल आणि मंत्रालयासमोरील मंत्री बंगल्यांचे नुतनीकरण आणि दुरूस्तीवर ६६ कोटी रूपये खर्च झाल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे बंगल्यात राहणारे मंत्रीही अनभिज्ञ असल्याचे काही मंत्र्यांशी संपर्क केल्यानंतर समोर आले आहे.
हेही वाचा…“तेव्हा रोखठोक अन् आता जागा मिळवण्यासाठी भाजपची लाचारी”, शरद पवार गटाने अजित पवारांना डिवचलं
रोहित पवारांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यासोबत लोकमतची बातमी देखील पोस्ट केली आहे. यावर मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधी रुपयांच्या खर्चाचा पूर वाहिला. पण मंत्र्यांनी नाही पाहिला. हेच सत्य जेंव्हा मी सभागृहात सांगितलं तेंव्हा ते ऐकून अनेकांचे चेहरे रागाने ‘गुलाबी’ झाले. पण आम्ही घाबरणार नाही.. जनतेच्या पैशांची ही लूट लोकांना सांगत राहणार. बोलत राहणार. असे रोहित पवारांनी म्हटलंय.
मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधी रुपयांच्या खर्चाचा पूर वाहिला…
पण मंत्र्यांनी नाही पाहिला.
हेच सत्य जेंव्हा मी सभागृहात सांगितलं तेंव्हा ते ऐकून अनेकांचे चेहरे रागाने ‘गुलाबी’ झाले…
पण आम्ही घाबरणार नाही..
जनतेच्या पैशांची ही लूट लोकांना सांगत राहणार…
बोलत राहणार… pic.twitter.com/4tRrjW8aSN— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 11, 2024
READ ALSO :
हेही वाचा“तु आता कोणत्याही बापाला समोर घेऊन आला तरी पराभव करू”, तानाजी सावंतांचा निंबाळकरांना इशारा
हेही वाचा…रविंद्र वायकर शिंदेंच्या शिवसेनेत दाखल, ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..”गद्दारांचं नशीब आहे की आज…”
हेही वाचा…“अजित पवारांना मोठा धक्का, पश्चिम महाराष्ट्रातील ‘हा’ बडा नेता शरद पवार गटात परतणार
हेही वाचा१ हजार ५० कोटींच्या विकासकामांचा ‘धम्माका’…,देवेंद्र फडणवीसांनी महेश लांडगे यांना दिले मोठं गिफ्ट
हेही वाचा…“लोकसभेच्या निवडणुकीत माझी तुम्ही काळजी घ्या”, पंकजा मुंडेंच्या विधानानंतर राजकीय चर्चांना उधाण