धाराशिव : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय सभांचा धडाका सुरू झाला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलिकडेच धाराशीव मतदारसंघाचा दौरा करत मंत्री तानाजी सावंत यांच्यावर जोरदार घणाघात चढवला. त्यावर आता तानाजी सावंत यांनी ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांना खासदारकीचं तिकीट द्यावं, यासाठी मी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना १० कोटींचा चेक दिला होता असा गौप्यस्फोट तानाजी सावंत यांनी केलाय. त्यातच तानाजी सावंत यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर टिका करत त्यांचा बेरोजगार खासदार म्हणून उल्लेख केलाय.
हेही वाचा…“तेव्हा रोखठोक अन् आता जागा मिळवण्यासाठी भाजपची लाचारी”, शरद पवार गटाने अजित पवारांना डिवचलं
ज्या तानाजी सावंतने तुझं तिकीट, तु तिथे खमका म्हणून उभा राहिला. त्या उद्धव ठाकरेला , पक्षाला १० कोटींचा चेकने निधी दिला. तुझ्यावरती कोट्यवधी रूपयांचा खर्च केला. तुला निवडून आणलं. तुला बापाची माया दिली आणि बापाची माया दिल्यानंतर लगेच बाप बदलला. असं कसं चालतं ? तुम्हाला मान्य आहे का ? आपल्या पोराने तु माझा बाप नाही हो आपला बाप आहे. असे म्हटलं तर आवडेल का ? असा सवाल करत तु आता कोणत्या बापाला समोर घेऊन आला तरी पराभव करू असा इशाराच तानाजी सावंत यांनी ओमराजे निंबाळकर यांना दिला आहे.
हेही वाचा…“आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो..” युवकांसाठी कॉंग्रेसची ‘पाच’ ऐतिहासिक गॅरेंटी
दरम्यान, निवडणुका जशा जशा जवळ येता आहेत. तशा तशा सभांचा धडाका सुरू झालाय. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे आता प्रत्येक मतदारसंघात दौरा करतांना दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील नेते देखील चांगलेच सक्रीय झाले असून राज्यात ठिकठिकाणी सभा होतांना दिसत आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…रविंद्र वायकर शिंदेंच्या शिवसेनेत दाखल, ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..”गद्दारांचं नशीब आहे की आज…”
हेही वाचा…“अजित पवारांना मोठा धक्का, पश्चिम महाराष्ट्रातील ‘हा’ बडा नेता शरद पवार गटात परतणार
हेही वाचा१ हजार ५० कोटींच्या विकासकामांचा ‘धम्माका’…,देवेंद्र फडणवीसांनी महेश लांडगे यांना दिले मोठं गिफ्ट
हेही वाचा…“लोकसभेच्या निवडणुकीत माझी तुम्ही काळजी घ्या”, पंकजा मुंडेंच्या विधानानंतर राजकीय चर्चांना उधाण
हेही वाचा…“900 एकरवर सभा, कोट्यवधी मराठे एकत्र येणार,” जरांगे पाटलांचा निवडणुकीपुर्वी सरकारला कडक इशारा