बीड : गेल्या काही वर्षांपासून निवडणुका जवळ आल्या की पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा होते. परंतु ऐनवेळी पंकजा मुंडे यांना निवडणुकीत डावलण्यात येते. यावेळी आता लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पंकजा मुंडे यांचं बीड लोकसभा मतदारसंघातून नाव पुढे येत आहे. अशातच त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून लोकसभा निवडणुक लढवण्याचे संकेत मिळाले आहेत.
हेही वाचा…मराठा आरक्षणाचं खापरं राज ठाकरेंनी भाजपवर फोडलं, म्हणाले..”हा प्रश्न रखडवत ठेवला जातो, कारण..”
मी सध्या माजी आमदार आणि माजी ग्रामविकास मंत्री आहे. त्यामुळे मला तुम्हाला काहीच देता येत नाही. पण इथे बसलेल्या किती जणांनी माजी केलं हे सांगताही येत नाही. लोकसभेच्या निवडणुकीत माझी तुम्ही काळजी घ्या. मी पुढे तुमची काळजी घेते असे विधान पंकजा मुंडे यांनी केले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना तिकीट मिळणार का ? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. बीड जिल्ह्यातल्या शिरूर येथे सिद्धेश्वर देवस्थान संस्थांच्या हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्याला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
हेही वाचा…“खोट्या शपथा घेऊन आई तुळजाभवानीचा अपमान करू नका”, भाजपचा ठाकरेंवर पलटवार
दरम्यान, पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, मला कोणी माजी केलं हे आता सांगता पण येत नाही. कारण सगळेच जण एकत्र आले आहेत. पण जेव्हा माझ्यावर रेड पडली तेव्हा माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी ११ कोटी रूपये जमा केले. हे माझं लोकांच्या ह्यदयाशी जोडलेले नातं आहे. सरकार सध्या तीन इंजिनने जोडलेलं असून काही वेळ हे इंजिने एकमेकांना भिडले होते, मात्र आता ते बरोबर पटरीवर चालत आहेत. असेही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“900 एकरवर सभा, कोट्यवधी मराठे एकत्र येणार,” जरांगे पाटलांचा निवडणुकीपुर्वी सरकारला कडक इशारा
हेही वाचा…“तेव्हा रोखठोक अन् आता जागा मिळवण्यासाठी भाजपची लाचारी”, शरद पवार गटाने अजित पवारांना डिवचलं
हेही वाचा…“आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो..” युवकांसाठी कॉंग्रेसची ‘पाच’ ऐतिहासिक गॅरेंटी
हेही वाचा..“रोहित पवारांचा सातत्याने केंद्रीय तपास यंत्रणांकडून छळ”, राऊतांची भाजपवर आगपाखड
हेही वाचा…“मित्रपक्षांनी भाजपशी लढावं, काँग्रेसचा नाद करू नये”, माजी महिला मंत्र्यांनी आंबेडकरांना फटकारलं