मुंबई : अमित शाह यांनी मातोश्रीवर येऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री अडीच वर्ष आणि भाजपचा मुख्यमंत्री अडीच वर्ष होईल. अडीच वर्षाच्या काळात भाजपाला सांभाळून घ्या, असे वचन गृहमंत्री अमित शाह यांनी दिलं होतं. मात्र ते वचन मी दिलंच नाही. अशी बोंब मारत असले तरी मी आई तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो की, होय अमित शाहांनी मातोश्रीवर येऊन दिलेलं वचन तोडलं. अशी भावनिक साद माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत केलं. त्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.
हेही वाचा…आढळरावांची निवडणुकीतून माघार ? शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट
धाराशिव येथे उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अमित शाह यांच्यासोबत झालेल्या चर्चाबाबत भाष्य केलं. त्यावरून आता बावनकुळे यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू म्हणतच वेळ येताच दगाबाजी करून अविचारी आघाडीच्या मांडीवर बसत मुख्यमंत्रीपद स्वत:च पटकावले. हा सामान्य शिवसैनिकांशी विश्वासघात नाही का ? असा सवाल बावनकुळे यांनी केला.
हेही वाचा..“मी महादेवाचा भक्त..तिसरा डोळा उघडेल तेंव्हा..,”कारखान्यावरील कारवाईनंतर रोहित पवारांचा कडक इशारा
ज्यांनी तुम्हाला भावासारखे प्रेम दिले. त्यांचे तुम्ही फोन घेतले नाहीत. अबोला धरला. दगाबाजी केली. तुम्ही बारामती व दिल्लीसमोर कुर्निंसात करत होते. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची कशाला खोटी शपथ घेता. तुम्हीच दगाबाजी केली. निवडणूक प्रचाराच्या जाहीर सभा मोदी, अमित भाई घेत होते, तेव्हाच हा खुलासा का केला नाही? कारण, काँग्रेस आणि शरद पवार यांच्याशी तुमच्या गोपनीय चर्चा सुरु होत्या. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून होतो. आणि आता कुलस्वामिनीसमोर शपथ घेता? असाही सवाल केला.
तसेच आता तुमचे पद गेले, पक्ष गेला, निशाणी गेली, विश्वासू माणसेही गेली. हिंदुत्व नासवले, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानावर मूग गिळून बसले, सनातन धर्मावर मिंधे झाले. प्रभू श्रीराम प्रतिष्ठापनेत राजकारण आणले..हाती धुपाटणे आले म्हणून पुन्हा ‘बंद खोलीतील’ रडगाणे सुरु झाले. तुम्ही आमचा विश्वासघात केला, आता किमान देवी देवतांचा विश्वासघात करू नका. असेही त्यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे , तुम्ही खोट्या शपथा घेऊन आई तुळजाभवानीचा अपमान करू नका@OfficeofUT जी,
शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू म्हणतच वेळ येताच दगाबाजी करून अविचारी आघाडीच्या मांडीवर बसत मुख्यमंत्रीपद स्वतःच पटकावले. हा सामान्य शिवसैनिकांशी विश्वासघात नाही का?
ज्यांनी तुम्हाला भावासारखे…
— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) March 9, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“शिर्डी मतदारसंघात मी स्वत: निवडणुक लढणार”, महायुतीकडून आठवलेंनी मागितली जागा
हेही वाचा..भास्कर जाधव उद्या मोठा निर्णय घेणार ? उद्या कार्यकर्त्यांसोबत एकत्रित संवाद साधणार
हेही वाचा…कॉंग्रेसने लोकसभेसाठी जाहीर केले ३९ उमेदवार, राहुल गांधी यांच्यासह नव्या चेहऱ्यांना संधी
हेही वाचा…“चर्चा कोणतीही होवो, माझं तिकीट कन्फर्म,” संजय मंडलकींचा कोल्हापुरच्या जागेवर दावा
हेही वाचा“शिंदे अन् अजित पवार गटाचा राजकीय अंत निश्चित, भाजप ४८ जागांवर निवडणुक लढवेल”