कोल्हापुर : आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शाहू महाराज यांना कोल्हापुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित मानली जात आहे. शाहू महाराज हे कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडणुक लढविणार अशा चर्चाही राज्याच्या राजकारणात सुरू झाल्या आहेत. मागील काही दिवसांपासून कोल्हापुर लोकसभा मतदारसंघाबाबतही अधिक चर्चा होतांना दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला २०२४ ला माझं तिकीट कन्फर्म असल्याचा दावा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी केला आहे.
हेही वाचा…“गडकरींना अपमानित करण्याच्या उद्देशानेच उमेदवारी भाजपने टाळली”, संजय राऊतांनी भाजपला डिवचलं
2019 च्या लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिक यांच्यावर मोठा विजय मिळवला होता. यातच आता धनंजय महाडिक हे महायुतीत सामिल झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून शाहू महाराज यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. यातच शाहू महाराज यांच्याविरोधात मीच तगडा उमेदवार असून कारण जाता जाता मी दहा हजार, पन्नास हजार नाही तर पावणे तीन लाखांच्या मतांनी निवडून आलो आहे. त्यामुळे उमेदवार निवडीचे निकष सिद्ध केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यापेक्षा अधिक ताकद लावणार असेही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“तर आपल्याच फडफडीने फांदी तुटून राम राम म्हणण्याची वेळ येईल”, राणेंनी कदमांना दिला इशारा
कोल्हापुर हे कुस्तीवर प्रेम करणारं शहर आहे. याठिकाणी तगड्या कुस्त्याच होतात. त्यामुळे समोरचा उमेदवार शाहू महाराज आहे की आणखी कोणी आहे. प्रत्येकाला मी तगडाच समजतो. कारण याठिकाणी दोन पक्षाची लढाई असून प्रत्येक जण तगडाच उमेदवार उभा करणार. त्यामुळे या विभागाचा त्यामुळे मागच्या निवडणुक लक्षात घेता मी देखील तगडाच उमेदार आहे. असेही संजय मंडलीक यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा“शिंदे अन् अजित पवार गटाचा राजकीय अंत निश्चित, भाजप ४८ जागांवर निवडणुक लढवेल”
हेही वाचा…आढळरावांची निवडणुकीतून माघार ? शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट
हेही वाचा..“मी महादेवाचा भक्त..तिसरा डोळा उघडेल तेंव्हा..,”कारखान्यावरील कारवाईनंतर रोहित पवारांचा कडक इशारा
हेही वाचा…“हरणाऱ्या नाही तर जिंकणाऱ्या जागा हव्यात”, वंचितचं घोंगड महाविकास आघाडीपुढे पुन्हा अडलं
हेही वाचा…रोहित पवारांना सर्वात मोठा धक्का, बारामती अॅग्रो कंपनीने खरेदी केलेला कारखाना ईडीकडून जप्त