मुंबई : लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने पहिल्या यादीत १९५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या नावाचाही समावेश आहे. महाराष्ट्रात अद्यापही कोणत्याही भाजपच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. भाजपच्या लोकासभेच्या उमेदवारांच्या पहिल्या यादित भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मुंबईतील कृपाशंकर सिंहांचे नाव आहे. अनेक ऐरेगैरे यांची नावे भाजपच्या पहिल्या यादित आहेत. पण नितीन गडकरी यांना पहिल्या यादीत डावलण्यात आल्याची टिका सामानातून करण्यात आली आहे. त्यावर आता भाजपकडून संजय राऊतांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. त्याला आता पुन्हा राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…चिखलीकरांची चिंता वाढली, नांदेड लोकसभेसाठी अशोक चव्हाण समर्थकाला संधी ?
सत्य असे आहे की : देवेंद्र फडणवीस हे मोदी शहा यांच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य आहेत. ते महाराष्ट्राचे, नागपूरचे आणि संघाचे प्रतिनिधित्व करतात. भाजपच्या सर्व दिग्गज नेत्यांचा समावेश असलेल्या भाजपच्या पहिल्या यादीत गडकरींचे नाव असायलाच हवे असा आग्रह ते करु शकले असते. महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला नसल्यामुळे महाराष्ट्राची यादी प्रलंबित आहे हा केवळ बहाणा आहे. गडकरींच्या नागपूर मतदारसंघाचा महायुतीच्या जागावाटपाशी कवडीचाही संबंध नाही. गडकरींना अपमानित करण्याच्या उद्देशानेच त्यांच्या उमेदवारीची घोषणा टाळण्यात आली असून या कारस्थानात केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य म्हणून फडणवीसही आनंदाने सामील झाले आहेत. असे राऊतांनी म्हटले आहे.
दरम्यान, या पक्षातील सामान्य कार्यकर्ता हा प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री होऊ शकतो आणि तो देशाचा पंतप्रधान देखील होऊ शकतो. संजय राऊत ज्यांची चाकरी करतात त्या उबाठा मध्ये केवळ घरकोंबडा बाप आणि त्याचा ३३ वर्षाच्या मुलालाच पद आणि सन्मान मिळतो. इतरांच्या वाट्याला केवळ मातोश्रीच्या प्रवेशद्वारावर अपमान येतो. आदरणीय नितीन गडकरी आमचे ज्येष्ठ नेते आहेत. गडकरी साहेबांचे कर्तृत्व मोठे आहे. संजय राऊत यांच्या सारख्या घरगड्यांनी त्यांची चिंता करू नये. असं भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
सत्य असे आहे की:
देवेंद्र फडणवीस हे मोदी शहा
यांच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य आहेत. ते महाराष्ट्राचे, नागपूरचे आणि संघाचे प्रतिनिधित्व करतात. भाजपच्या सर्व दिग्गज नेत्यांचा समावेश असलेल्या भाजपच्या पहिल्या यादीत गडकरींचे नाव असायलाच हवे असा आग्रह ते करु शकले असते.… pic.twitter.com/MMobUyPsHa— Sanjay Raut (@rautsanjay61) March 8, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“तर आपल्याच फडफडीने फांदी तुटून राम राम म्हणण्याची वेळ येईल”, राणेंनी कदमांना दिला इशारा
हेही वाचा.ही लढाई आता ‘वाघ विरूद्ध लांडगे’, अमित शाहांचा उल्लेख करत ठाकरेंनी भाजपला डिवचलं
हेही वाचा..‘त्या’ मुख्य अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित केलेच पाहिजे ” आदित्य ठाकरेंची राज्यपालांकडे मागणी
हेही वाचा…सुधा मूर्ती यांची राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा खासदार म्हणून निवड, कर्नाटकात भाजपला फायदा होणार का ?
हेही वाचा…गडकरींना तिसऱ्यांदा संधी, १० नव्या उमेदवारांना संधी, भाजपाची दुसरी यादी जाहीर होणार