मुंबई : जागावाटपावरून सध्या महायुतीत मोठा वाद सुरू झाला आहे. यातच शिवसेना शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांनी भाजपवर गंभीर आरोप करत एकच खळबळ उडवून दिली होती. भाजपने केसाने गळा कापू नये अन्यथा माझं नाव रामदास कदम आहे हे लक्षात ठेवा असे जाहीर विधान रामदास कदम यांनी केलं होतं. यालाच आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यावर भाष्य केले आहे.
हेही वाचा…चिखलीकरांची चिंता वाढली, नांदेड लोकसभेसाठी अशोक चव्हाण समर्थकाला संधी ?
आमचे मित्रपक्ष व सहकारी यांच्या गळ्यात हार पडावे , त्यांचा सन्मान व्हावा यासाठी भारतीय जनता पक्ष नेहमी कार्यरत असतो. आम्ही केसाने गळा कापत नाही. केसाने गळा कापणारे आता रानोमाळ फिरत आहेत. आपणच आपले नाव घेऊन काय उपयोग? जनमानसात आपले नाव असले पाहिजे. फांदीवर बसलेल्यांनी आव्हानाची भाषा करु नये, नाही तर आपल्याच फडफडीने फांदी तुटून राम राम म्हणण्याची वेळ येईल. असे नारायण राणे यांनी म्हटलंय.
दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील नाराज नेत्यांच्या मुलांना खुश ठेवण्यासाठी “लॉलीपॉप” वाटप करण्यात आलं आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी रामदास कदम यांचे सुपुत्र सिद्धेश कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियम डावलून ही नियुक्ती करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. जागा वाटपावरून गेले काही दिवस रामदास कदम भाजपवर टीका करत आहे आणि आता त्यांच्या मुलाची प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करून लॉलीपॉप देण्याचा हा प्रयत्न दिसत आहे. लोकसभा जागांच्या बदल्यात भाजप – शिंदे आणि अजित पवार गटातील नाराज नेत्यांना सरकारी पद वाटून सेटलमेंट करण्यासाठी ही शासकीय पदे आहे का ? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे.
आमचे मित्रपक्ष व सहकारी यांच्या गळ्यात हार पडावे , त्यांचा सन्मान व्हावा यासाठी भारतीय जनता पक्ष नेहमी कार्यरत असतो. आम्ही केसाने गळा कापत नाही. केसाने गळा कापणारे आता रानोमाळ फिरत आहेत. आपणच आपले नाव घेऊन काय उपयोग? जनमानसात आपले नाव असले पाहिजे. फांदीवर बसलेल्यांनी आव्हानाची…
— Narayan Rane (मोदी का परिवार) (@MeNarayanRane) March 8, 2024
READ ALSO :
हेही वाचा“निवडणुकीच्या तोंडावर नाराज नेत्यांच्या मुलांना खुश ठेवण्यासाठी “लॉलीपॉप” वाटप”
हेही वाचा.ही लढाई आता ‘वाघ विरूद्ध लांडगे’, अमित शाहांचा उल्लेख करत ठाकरेंनी भाजपला डिवचलं
हेही वाचा..‘त्या’ मुख्य अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित केलेच पाहिजे ” आदित्य ठाकरेंची राज्यपालांकडे मागणी
हेही वाचा…सुधा मूर्ती यांची राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा खासदार म्हणून निवड, कर्नाटकात भाजपला फायदा होणार का ?
हेही वाचा…गडकरींना तिसऱ्यांदा संधी, १० नव्या उमेदवारांना संधी, भाजपाची दुसरी यादी जाहीर होणार