मुंबई : मुंबई महानगरपालिका आणि भारतीय रेल्वेने केलेली गोखले पुलाची पुनर्बांधणी ही देशाला लाजवेल अशी गोष्ट आहे. यंत्रणांच्या या अपयशाची बातमी जगभरात पसरली आहे. परंतु यंत्रणा दोषारोपाच्या खेळात मग्न झाल्या आहेत. या प्रकल्पातील मुख्य दायित्व असलेले महापालिका आयुक्त चहल आणि रेल्वेच्या समकक्ष अधिकाऱ्यांच्या निलंबणाचे आदेश जारी करावेत. अशी मागणी शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
हेही वाचा…“नितीन गडकरींवर केलेली टिका भाजपच्या जिव्हारी,” भाजपने संजय राऊतांना चांगलचं सुनावलं
या प्रकल्पात हस्तक्षेप करून गडबड करता येणार नाही आणि निर्लज्जपणे करदात्यांच्या कोट्यावधी रूपयांची उधळपट्टी केल्याबद्दल निष्पक्ष चौकशीला सामोरे जाता येईल. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची बदली तर बऱ्याच काळापासून रखडलेली आहे आणि निवडणूक आयोगाच्या आदेशानंतरही घटनाबाह्य मुख्यमंत्री निवडणुक आयोगाला गृहीत धरत आयुक्तांची बदली करणे टाळत असल्याचाही उल्लेख आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात केलं आहे.
हेही वाचा…यंदा कॉंग्रेस लोकसभेच्या ३०० जागा लढवणार, भाजपला देणार कडवं आव्हान
दरम्यान गोखले पुल हे राजकारणी-अधिकारी-कंत्राटदार यांच्या सगंनमताचे ढळढळीत उदाहरण आहे. ज्याठिकाणी स्थानिक आमदारांनी अधिकाऱ्यांसह पुलाला अनेकदा भेट दिली. या भेटींमधअये त्यांना दोष दिसला नाही का ? की मुद्दाम हा दोष निर्माण करण्यात आला होता.जेणेकरून आता दुसरा पुल तोडून पुन्हा बांधता येईल ? या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी अपेक्षित आहे आणि त्यामुळे चौकशीला सामोरे जाण्यासाठी आयुक्त रेल्वेसाठी संबंधित मुख्य अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित केलेच पाहिजे असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.
राज्यपाल महोदयांना माझे पत्र…
मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांचे निलंबन आणि गोखले पुलाच्या पुनर्बांधणीत झालेल्या लाजिरवाण्या प्रकरणाच्या चौकशीसाठी मी माननीय राज्यपाल श्री. रमेश बैस ह्यांच्याकडे पत्राद्वारे निष्पक्ष चौकशीची मागणी केली.
My letter to the hon’ble governor, seeking… pic.twitter.com/2ix2QL3ACS
— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 8, 2024
READ ALSO :
हेही वाचा…सुधा मूर्ती यांची राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा खासदार म्हणून निवड, कर्नाटकात भाजपला फायदा होणार का ?
हेही वाचा…गडकरींना तिसऱ्यांदा संधी, १० नव्या उमेदवारांना संधी, भाजपाची दुसरी यादी जाहीर होणार
हेही वाचा…चिखलीकरांची चिंता वाढली, नांदेड लोकसभेसाठी अशोक चव्हाण समर्थकाला संधी ?
हेही वाचाडझनभर विद्यमान खासदाराला भाजप देणार नाराळ, नव्या उमेदवारांना संधी, राजकीय हालचाली वाढल्या