नवी दिल्ली : अलिकडेच देशातील राज्यसभेतील ५६ खासदारांचा कार्यकाळ संपला आहे. त्यानंतर १६ राज्यात राज्यसभेची निवडणुक पार पडली. या निवडणुकीत काही ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आले तर काही ठिकाणी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यात आलं. त्यामुळे राज्यसभेतही आता भाजप बहुमताच्या जवळ पोहचलं आहे. अशात आता राष्ट्रपदी नामनिर्देशित राज्यसभा खासदार म्हणून सुधा मुर्ती यांची निवड करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलीयत.
हेही वाचा…यंदा कॉंग्रेस लोकसभेच्या ३०० जागा लढवणार, भाजपला देणार कडवं आव्हान
सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका, इन्फोसिसच्या नारायण मुर्ती यांच्या पत्नी सुधा मुर्ती यांची राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे. सुधा मुर्ती यांचे जावई ब्रिटनचे पंतप्रधान आहेत. आता सासूबाई राज्यसभा खासदार झाल्या आहे. यातच सुधा मुर्ती या कर्नाटकमधून येत असल्याने त्यांच्या निवडीचा भाजपला काही फायदा होणार का ? असा सवाल देखील यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. तसेच मागच्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपला दक्षिणेत पाहिजे तसा यश मिळाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे भाजपने आता दक्षिणेत लक्ष केंद्रीत केलंंय. त्यामुळेच मुर्ती यांच्या निवडीमागे भाजपचा राजकीय हेतू असल्याचं दिसून येत आहे.
हेही वाचा…“भाजप EVM शिवाय ४०० पार होणार नाही म्हणून..,” प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान
भारताच्या राष्ट्रपतींनी आपल्याला नामांकित केल्याबाबत मला आनंद होत आहे. सामाजिक कार्य, शिक्षण यासह विविक्ष क्षेत्रात सुधा मुर्ती यांचे प्रेरणादायी आणि प्रंचड योगदान आहे. राज्यसभेतील त्यांची उपस्थिती आमच्या नारी शक्तीचा एक भाग आहे. ज्या आपल्या देशाचे नशीव घडवण्यात महिलांच्या सामर्थ्याचे उदाहण आहे. असेही मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
I am delighted that the President of India has nominated @SmtSudhaMurty Ji to the Rajya Sabha. Sudha Ji’s contributions to diverse fields including social work, philanthropy and education have been immense and inspiring. Her presence in the Rajya Sabha is a powerful testament to… pic.twitter.com/lL2b0nVZ8F
— Narendra Modi (@narendramodi) March 8, 2024
READ ALSO :
हेही वाचा…गडकरींना तिसऱ्यांदा संधी, १० नव्या उमेदवारांना संधी, भाजपाची दुसरी यादी जाहीर होणार
हेही वाचा…चिखलीकरांची चिंता वाढली, नांदेड लोकसभेसाठी अशोक चव्हाण समर्थकाला संधी ?
हेही वाचाडझनभर विद्यमान खासदाराला भाजप देणार नाराळ, नव्या उमेदवारांना संधी, राजकीय हालचाली वाढल्या
हेही वाचा…“नितीन गडकरींवर केलेली टिका भाजपच्या जिव्हारी,” भाजपने संजय राऊतांना चांगलचं सुनावलं