मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकासाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री अमित शाह तसेच इतर असे मिळून १९५ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यातच आता भाजपकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात येणार आहे. या यादीत महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपच्या काही नव्या उमेदवारांची घोषणा होणार असून अनेकांना लॉटरी तर विद्यमान खासदारांना धक्का बसण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…“भाजप EVM शिवाय ४०० पार होणार नाही म्हणून..,” प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तिसऱ्यांदा नागपुरातून रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासह भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेतून संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना वर्धा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार अस्लयाची चर्चा आहे. यातच भाजप लोकसभेच्या रिंगणात सुमारे १० नवीन चेहऱ्यांना संधी देईल अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा..“भाजपला केवळ श्रीमंतांचाच पुळका”, वर्षा गायकवाडांनी भाजपवर हात धुवून घेतला
यातच केंद्रीय मंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी मुंबईत भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी शाहांनी शिंदे-पवारांना लोकसभेत सांभाळून घ्या. त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही शिवसेना-राष्ट्रवादीला पुर्ण पाठिंबा देऊ असं आश्वासनही त्यांनी दिलेय. राज्यात भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीविरोधात कॉंग्रेस- शिवसेना- राष्ट्रवादी शरदचंद्र पवार अशी लढाई पाहायला मिळणार आहे. यातच पुढील २ दोन दिवसांत भाजप १५० उमेदवारांच्या नावाची दुसरी यादी करणार आहे. निवडणूक तारखेच्या घोषणेआधीच भाजप ३४५ उमेदवार घोषीत करू शकते. ज्यामुळे निवडणुक प्रचाराला जास्तीत जास्त वेळ मिळम्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…चिखलीकरांची चिंता वाढली, नांदेड लोकसभेसाठी अशोक चव्हाण समर्थकाला संधी ?
हेही वाचाडझनभर विद्यमान खासदाराला भाजप देणार नाराळ, नव्या उमेदवारांना संधी, राजकीय हालचाली वाढल्या
हेही वाचा…“नितीन गडकरींवर केलेली टिका भाजपच्या जिव्हारी,” भाजपने संजय राऊतांना चांगलचं सुनावलं
हेही वाचा…यंदा कॉंग्रेस लोकसभेच्या ३०० जागा लढवणार, भाजपला देणार कडवं आव्हान