मुंबई : जागावाटपावरून सध्या महायुतीत मोठा वाद सुरू झाला आहे. यातच शिवसेना शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांनी भाजपवर गंभीर आरोप करत एकच खळबळ उडवून दिली होती. भाजपने केसाने गळा कापू नये अन्यथा माझं नाव रामदास कदम आहे हे लक्षात ठेवा असे जाहीर विधान रामदास कदम यांनी केलं होतं. यातच आता रामदास कदम यांनी नाराजी भाजपकडून दुर करण्यात आली आहे. रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश कदम यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टिका केली आहे.
नियमांनुसार पर्यावरण संरक्षणाशी संबंधित क्षेत्रांमध्ये २५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या किंवा पर्यावरण संरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्था संघटनेत २५ वर्षापेत्रा अदिक काळ काम केलेल्या व्यक्तीची या पदावर नियुक्ती करण्यात येते. त्यामुळे सिद्धेश कदम यांनी पर्यावरणाच्या क्षेत्रात खरंच इतकं काम केलं आहे का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जातो.
हेही वाचा…डझनभर विद्यमान खासदाराला भाजप देणार नाराळ, नव्या उमेदवारांना संधी, राजकीय हालचाली वाढल्या
दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील नाराज नेत्यांच्या मुलांना खुश ठेवण्यासाठी “लॉलीपॉप” वाटप करण्यात आलं आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी रामदास कदम यांचे सुपुत्र सिद्धेश कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियम डावलून ही नियुक्ती करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. जागा वाटपावरून गेले काही दिवस रामदास कदम भाजपवर टीका करत आहे आणि आता त्यांच्या मुलाची प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करून लॉलीपॉप देण्याचा हा प्रयत्न दिसत आहे. लोकसभा जागांच्या बदल्यात भाजप – शिंदे आणि अजित पवार गटातील नाराज नेत्यांना सरकारी पद वाटून सेटलमेंट करण्यासाठी ही शासकीय पदे आहे का ? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील नाराज नेत्यांच्या मुलांना खुश ठेवण्यासाठी “लॉलीपॉप” वाटप!
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी रामदास कदम यांचे सुपुत्र सिद्धेश कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नियम डावलून ही नियुक्ती करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली…
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) March 8, 2024
READ ALSO :
हेही वाचा.ही लढाई आता ‘वाघ विरूद्ध लांडगे’, अमित शाहांचा उल्लेख करत ठाकरेंनी भाजपला डिवचलं
हेही वाचा..‘त्या’ मुख्य अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित केलेच पाहिजे ” आदित्य ठाकरेंची राज्यपालांकडे मागणी
हेही वाचा…सुधा मूर्ती यांची राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा खासदार म्हणून निवड, कर्नाटकात भाजपला फायदा होणार का ?
हेही वाचा…गडकरींना तिसऱ्यांदा संधी, १० नव्या उमेदवारांना संधी, भाजपाची दुसरी यादी जाहीर होणार
हेही वाचा…चिखलीकरांची चिंता वाढली, नांदेड लोकसभेसाठी अशोक चव्हाण समर्थकाला संधी ?