पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. रोहित पवारांचा बारामती अॅग्रो कंपनीने खरेदी केलेला कारखाना जप्त करण्यात आला आहे. कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीकडून जप्त करण्यात आला आहे. शिखर बॅंक घोटाळा प्रकरणात ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली असून तब्बल ५० कोटी रूपयांचा कारखाना जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे याची सध्या एकच चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा…गडकरींना तिसऱ्यांदा संधी, १० नव्या उमेदवारांना संधी, भाजपाची दुसरी यादी जाहीर होणार
शिखर बॅंक घोटाळा प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरू आहे. याच प्रकरणाबाबत रोहित पवारांची देखील इडीकडून चौकशी करण्यात आली होती. आज अखेर रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीचा कन्नड कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे. औरंगाबाद मध्ये असलेला कन्नड साखर कारखाना हा ५० कोटीचा कारखाना आहे. यासह १६४ एक जमीन असून साखर कारखान्याची साधनसंपत्ती देखील जप्त करण्यात आल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा…चिखलीकरांची चिंता वाढली, नांदेड लोकसभेसाठी अशोक चव्हाण समर्थकाला संधी ?
याआधी रोहित पवारांची दोन ते तीन वेळा याप्रकरणाबाबत चौकशी करण्यात आली होती. यामध्ये साखर कारखाना लिलाव प्रक्रियेत कागदपत्रात फेरबदल केल्याचे ईडीने म्हटलं होतं. शिखर बॅंक च्या समितीवर असलेल्या व्यक्तीचे महाराष्ट्रात असणाऱ्या कारखान्यात गैरव्यवहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून या विविध लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतला होता.
READ ALSO :
हेही वाचा…“गडकरींना अपमानित करण्याच्या उद्देशानेच उमेदवारी भाजपने टाळली”, संजय राऊतांनी भाजपला डिवचलं
हेही वाचा…“तर आपल्याच फडफडीने फांदी तुटून राम राम म्हणण्याची वेळ येईल”, राणेंनी कदमांना दिला इशारा
हेही वाचा.ही लढाई आता ‘वाघ विरूद्ध लांडगे’, अमित शाहांचा उल्लेख करत ठाकरेंनी भाजपला डिवचलं
हेही वाचा..‘त्या’ मुख्य अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित केलेच पाहिजे ” आदित्य ठाकरेंची राज्यपालांकडे मागणी
हेही वाचा…सुधा मूर्ती यांची राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा खासदार म्हणून निवड, कर्नाटकात भाजपला फायदा होणार का ?