नवी दिल्ली : भाजपप्रमाणेच लोकसभा निवडणुकांच्या घोषणापुर्वीच कॉंग्रेसने देखील आपल्या उमेदवारांच्या नावांची पहिली यादी घोषीत केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने शुक्रवारी ३९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी पुन्हा एकदा केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणुक लढवणार आहेत. मात्र या यादीत महाराष्ट्रातील कोणत्याही उमेदवाराची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.
हेही वाचा…रोहित पवारांना सर्वात मोठा धक्का, बारामती अॅग्रो कंपनीने खरेदी केलेला कारखाना ईडीकडून जप्त
राहुल गांधी यांच्यासह कॉंग्रेसचे संघटन व सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भुपेश बाघेल, आणि माजी मंत्री शशी थरूर यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलाय. आज जाहीर केलेल्या ३९ जागांपैकी २०१९ च्या निवडणुकीत कॉंग्रेसने १९ जागा जिंकल्या होत्या. तर या १९ पैकी १६ जागांवर विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आलीय.
हेही वाचा…“गडकरींना अपमानित करण्याच्या उद्देशानेच उमेदवारी भाजपने टाळली”, संजय राऊतांनी भाजपला डिवचलं
२ जागांवर विद्यमान खासदाराचे तिकीट कापून नवे उमेदवार देण्यात आले आहे. तर ३९ उमेदवारांपैकी तीन महिलांना पहिल्या यादीत संधी देण्यात आलीय. कॉंग्रेसने छत्तीसगडमधील सहा, कर्नाटकातील सात, तेलंगणातील चार, मेघालयातील दोन आणि लक्षद्वीप, नागालॅंड, सिक्किम आणि त्रिपुरामधील प्रत्येकी एका जागेसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.
छत्तीसगडच्या कोरबा मतदारसंघाच्या खासदार ज्योत्स्ना महंत आणि कर्नाटकच्या बंगळुरू ग्रामीण मतदारसंघाचे विद्यमान खासदार डी. के. सुरेश यांच्यावर कॉंग्रेसने पुन्हा विश्वास दाखवला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“चर्चा कोणतीही होवो, माझं तिकीट कन्फर्म,” संजय मंडलकींचा कोल्हापुरच्या जागेवर दावा
हेही वाचा“शिंदे अन् अजित पवार गटाचा राजकीय अंत निश्चित, भाजप ४८ जागांवर निवडणुक लढवेल”
हेही वाचा…आढळरावांची निवडणुकीतून माघार ? शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट
हेही वाचा..“मी महादेवाचा भक्त..तिसरा डोळा उघडेल तेंव्हा..,”कारखान्यावरील कारवाईनंतर रोहित पवारांचा कडक इशारा
हेही वाचा…“हरणाऱ्या नाही तर जिंकणाऱ्या जागा हव्यात”, वंचितचं घोंगड महाविकास आघाडीपुढे पुन्हा अडलं