मुंबई : आागामी लोकसभा निवडणुकांसाठी जागावाटपाचा तिढा महायुतीत अजूनही सुटलेला नाहीय. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्याने दिल्लीला जात आहेत. अशातच महायुतीत भाजपकडून अजित पवारांच्या गटाला तीन ते पाच जागा देण्यात येणार असल्याची माहिती समोर आलीय. त्यावरून शरद पवार गटाने अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधत टोलेबाजी केली आहे.
हेही वाचा…“शिर्डी मतदारसंघात मी स्वत: निवडणुक लढणार”, महायुतीकडून आठवलेंनी मागितली जागा
काल केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासह अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये दिल्लीत जागावाटपाबाबत बैठक पार पडली. परंतु या बैठकीत जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी पाच ते सहा जागांवर अजूनही मतभेद असल्याचे दिसून येत आहे. तर यासंदर्भात पुढची बैठक ही १४ मार्चला होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, यावरून शरद पवार गटाने अजित पवारांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभेच्या जागांसाठी अजित पवारांना दिल्लीची करावी लागणारी हाजी हाजी यातून एका मराठी माणसाला इतकं लाचार व्हावं लागतंय जे की, महाराष्ट्राचं दुर्दैवच म्हणावं लागेल. काय होतास तू…. काय झालास तू… या गाण्याच्या ओळी अजित पवारांच्या आजच्या अवस्थेला अतिशय समर्पक ठरत आहेत. असा टोलाही त्यांनी लगावला.
हेही वाचा…भास्कर जाधव उद्या मोठा निर्णय घेणार ? उद्या कार्यकर्त्यांसोबत एकत्रित संवाद साधणार
अजित पवारांसारख्या राजकीय क्षेत्रातील एका मराठी माणसाला भाजपकडून ३ जागा देऊन गप्प बसवण्यात येत आहे. आणखी एक जागा पदरात पडावी यासाठी दिल्लीच्या तख्याच्या पायऱ्या झिझवाव्या लागतात ही महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील किती निंदणीय बाब आहे. एक अजित पवार होते जे रोखठोक होते आणि आजचे एक अजित पवार आहेत जे जागा मिळवण्यासाठी भाजपची लाचारी करतायेत. महाराष्ट्राचं मोठं दुर्दैव असेही म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो..” युवकांसाठी कॉंग्रेसची ‘पाच’ ऐतिहासिक गॅरेंटी
हेही वाचा..“रोहित पवारांचा सातत्याने केंद्रीय तपास यंत्रणांकडून छळ”, राऊतांची भाजपवर आगपाखड
हेही वाचा…“मित्रपक्षांनी भाजपशी लढावं, काँग्रेसचा नाद करू नये”, माजी महिला मंत्र्यांनी आंबेडकरांना फटकारलं
हेही वाचामराठा आरक्षणाचं खापरं राज ठाकरेंनी भाजपवर फोडलं, म्हणाले..”हा प्रश्न रखडवत ठेवला जातो, कारण..”
हेही वाचा…“खोट्या शपथा घेऊन आई तुळजाभवानीचा अपमान करू नका”, भाजपचा ठाकरेंवर पलटवार