पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीने खरेदी केलेला कारखाना जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित पवारांच्या कन्नड सहकारी साखर कारखान्यावर ईडीने जप्तीचे आदेश दिले आहेत. यावरून रोहित पवारांना मोठा धक्का बसला आहे. तर यांना मी भाजपमध्ये प्रवेश करावा असे वाटत आहे. म्हणून माझ्यावर कारवाया सुरू असल्याचे रोहित पवारांनी सांगितले. त्यावरून आता खासदार संजय राऊतांनी देखील सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.
हेही वाचा…कॉंग्रेसने लोकसभेसाठी जाहीर केले ३९ उमेदवार, राहुल गांधी यांच्यासह नव्या चेहऱ्यांना संधी
रोहित पवारांवर तपास यंत्रणा सातत्याने कारवाई करतांना दिसत आहे. त्यांना वारंवार तपासाठी बोलवलं जात असून त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा छळ केला जात आहे. त्यांचा नेमका गुन्हा काय ? दिल्लीच्या मोगलशाहीच्या विरोधात महाराष्ट्र न झुकणाऱ्याची रोहित पवारांनी भूमिका घेतली आहे. पुढे लोकसभा निवडणुका आहेत. महाराष्ट्राचे लचके, स्वाभिमानावर हल्ला सुरू आहे. इतर सगळे गप्प बसले आहेत. परंतु उद्धव ठाकरे, शरद पवार, रोहित पवार यांच्यावर अनेक कारवाया सुरू आहेत झाल्या आहेत. परंंतु तुमच्यासमोर गुघडे टेकणार नाही हे रोहित पवरांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा…“चर्चा कोणतीही होवो, माझं तिकीट कन्फर्म,” संजय मंडलकींचा कोल्हापुरच्या जागेवर दावा
माझ्या कंपनीवर ED ने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का? पण भाजपाने लक्षात ठेवावं. झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू! माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावीत! या कारवाईवरुन आचारसंहिता येत्या दोन-तीन दिवसांतच लागेल, हेही दिसतंय. असेही रोहित पवारांनी सांगितलंय.
दरम्यान, ही कारवाई पूर्णतः बेकायदा असून याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, त्यामुळं कर्मचाऱ्यांनी कोणतीही काळजी करु नये. पण प्रश्न इतकाच आहे की, अशी कारवाई केवळ माझ्याविरोधातच का? पण सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना आज तरी असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही! वाढदिवसाच्या दिवशीही अशाच एका एजन्सीने कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी दुसरी कारवाई.. परंतु मी महादेवाचा भक्त आहे… अन्यायाविरोधात जनता जनार्दनरुपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेव्हा अनेकांच थयथयाट झाल्याशिवाय राहणार नाही. असा इशाराही त्यांनी दिलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“मित्रपक्षांनी भाजपशी लढावं, काँग्रेसचा नाद करू नये”, माजी महिला मंत्र्यांनी आंबेडकरांना फटकारलं
हेही वाचामराठा आरक्षणाचं खापरं राज ठाकरेंनी भाजपवर फोडलं, म्हणाले..”हा प्रश्न रखडवत ठेवला जातो, कारण..”
हेही वाचा…“खोट्या शपथा घेऊन आई तुळजाभवानीचा अपमान करू नका”, भाजपचा ठाकरेंवर पलटवार
हेही वाचा…“शिर्डी मतदारसंघात मी स्वत: निवडणुक लढणार”, महायुतीकडून आठवलेंनी मागितली जागा
हेही वाचा..भास्कर जाधव उद्या मोठा निर्णय घेणार ? उद्या कार्यकर्त्यांसोबत एकत्रित संवाद साधणार