पुणे : राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर अनेक जण शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटात सामील झालेत. मात्र लोकसभा निवडणुकांच्या पुर्वीच आता अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अजित पवारांचे अत्यंत विश्वासू आमदार निलेश लंके शरद पवार गटात लवकरच प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. लोणावळा येथील तब्बल १३७ पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांची साथ सोडल्यानंतर आता लंके देखील साथ सोडल्याने याचा मोठा फटका अजित पवारांना बसणार आहे. यातच शरद पवार गटात निलेश लंके यांना मोठी लॉटरी लागण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा..“रोहित पवारांचा सातत्याने केंद्रीय तपास यंत्रणांकडून छळ”, राऊतांची भाजपवर आगपाखड
आगामी लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मधून निलेश लंके यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. महायुतीत सुजय विखे पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. परंतु निलेश लंके यांनी देखील निवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. अशातच खासदार अमोल कोल्हे यांनी देखील निलेश लंके यांना महाविकास आघाडीत येण्याची खुली ऑफर दिली होती. तसेच लोकनेत्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी नगर दक्षिणमध्ये वाजवलीच पाहिजे, असे कोल्हे यांनी म्हटले होते. त्यानंतर आता निलेश लंके शरद पवार गटात दाखल होत असून त्यांना नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…“मित्रपक्षांनी भाजपशी लढावं, काँग्रेसचा नाद करू नये”, माजी महिला मंत्र्यांनी आंबेडकरांना फटकारलं
दरम्यान, राष्ट्रवादीत पक्ष फुट पडल्यानंतर निलेश लंके यांनी सुरूवातीला अजित पवारांची साथ दिली. मात्र लंके यांच्या सर्वच कार्यक्रमात शरद पवारांचे फोटो लागलेले दिसून आले. अशातच निलेश लंके नेमकी कोणत्या गटात आहेत ? असा प्रश्न कार्यकर्त्यांना वारंवार पडत होता. मध्यंतरी खासदार कोल्हे यांनी देखील लंकेंना खुली ऑफर दिली होती.
READ ALSO :
हेही वाचा१ हजार ५० कोटींच्या विकासकामांचा ‘धम्माका’…,देवेंद्र फडणवीसांनी महेश लांडगे यांना दिले मोठं गिफ्ट
हेही वाचा…“लोकसभेच्या निवडणुकीत माझी तुम्ही काळजी घ्या”, पंकजा मुंडेंच्या विधानानंतर राजकीय चर्चांना उधाण
हेही वाचा…“900 एकरवर सभा, कोट्यवधी मराठे एकत्र येणार,” जरांगे पाटलांचा निवडणुकीपुर्वी सरकारला कडक इशारा
हेही वाचा…“तेव्हा रोखठोक अन् आता जागा मिळवण्यासाठी भाजपची लाचारी”, शरद पवार गटाने अजित पवारांना डिवचलं
हेही वाचा…“आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो..” युवकांसाठी कॉंग्रेसची ‘पाच’ ऐतिहासिक गॅरेंटी