मुंबई : उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू समजणारे आमदार रविंद्र वायकर यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेते प्रवेश केला आहे. त्यामुळे लोकसभेची निवडणुक तोंडावर आलेली असतांना ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणी ईडी चौकशीच्या रडारवर रविंद्र वायकर आले आहेत. त्यामुळेच रविंद्र वायकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला असल्याची टिका होत आहे. यावरून ठाकरेंनी देखील टिका केली आहे.
हेही वाचा…“आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो..” युवकांसाठी कॉंग्रेसची ‘पाच’ ऐतिहासिक गॅरेंटी
रविंद्र वायकर यांनी बाळासाहेबांचे खरे विचार जोपासणाऱ्या शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यांना शुभेच्छा देतो. गेली ४० ते ५० वर्षे बाळासाहेबांसोबत त्यांनी शिवसेनेचे काम केलेले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपण सगळेच शिवसेनेचं काम करतोय. बाळासाहेबांचे विचार पुर्ण राज्यभरात पोहोचवण्याचे काम आपण करतोय. मी पुर्ण वायकर कुटुंबाचे स्वागत करतो. वायकर यांनी मला त्यांच्या मतदारसंघातील समस्या सांगितल्या आहेत. असे यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले. सर्वसामान्य मुंबईकरांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही काम करत असतो. आपल्या मतदारसंघातील कामे झाली पाहिजेत म्हणून त्यांनी आज आमच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी म्हटले.
हेही वाचा..“रोहित पवारांचा सातत्याने केंद्रीय तपास यंत्रणांकडून छळ”, राऊतांची भाजपवर आगपाखड
दरम्यान, शिवसैनिकांचं प्रेम खोक्यातून मिळत नसतं. शिवसेनेच्या मुळावर कुणी घाव घालत असताना हा शिवसैनिक गप्प बसेल का ? गद्दारांचं नशीब आहे की आज शिवसेनाप्रमुख नाहीयेत. नाही तर यांची कधीच वाट लागली असती. मी थोडा संयमी आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी लढणारच नाही. पण तुम्हाला काढून टाकण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये असल्याची टिका उद्धव ठाकरे यांनी केली.
READ ALSO :
हेही वाचा…“अजित पवारांना मोठा धक्का, पश्चिम महाराष्ट्रातील ‘हा’ बडा नेता शरद पवार गटात परतणार
हेही वाचा१ हजार ५० कोटींच्या विकासकामांचा ‘धम्माका’…,देवेंद्र फडणवीसांनी महेश लांडगे यांना दिले मोठं गिफ्ट
हेही वाचा…“लोकसभेच्या निवडणुकीत माझी तुम्ही काळजी घ्या”, पंकजा मुंडेंच्या विधानानंतर राजकीय चर्चांना उधाण
हेही वाचा…“900 एकरवर सभा, कोट्यवधी मराठे एकत्र येणार,” जरांगे पाटलांचा निवडणुकीपुर्वी सरकारला कडक इशारा
हेही वाचा…“तेव्हा रोखठोक अन् आता जागा मिळवण्यासाठी भाजपची लाचारी”, शरद पवार गटाने अजित पवारांना डिवचलं